Headlines

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 57 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडून तपास सुरू




शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी ५७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथे राहणारे तक्रारदार एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी तक्रारदाराला जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात तक्रारदाराने वेळोवेळी ५७ लाख १० हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कृषि विभागात नोकरीच्या आमिषाने फसवणूक दुसरीकडे, ‘कृषी विभागात ‘कृषीमित्र’ होण्याची संधी’ अशी जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी समाज माध्यमातील खातेधारकाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने अलंकार पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. कृषी विभागात ‘कृषीमित्र’ हे पद अस्तित्वात नसतानाही, समाज माध्यमातील एका खात्यातून ही बनावट जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. या जाहिरातीत एक मोबाइल क्रमांक देऊन शासकीय नोकरीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, कृषी मंत्र्यांचे छायाचित्रही वापरण्यात आले होते. कृषी विभागाच्या नावाने बनावट जाहिरात प्रसारित झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *