Headlines

भाडे न देता मित्राने खोली सोडली, धमकीमुळे मध्यस्थीची आत्महत्या:रांजणगाव शेणपुंजीतील घटना; घरमालकाने सर्वांसमोर अपमान केल्याने घेतला गळफास



मित्राला मध्यस्थीने भाड्याने खोली घेऊन दिली. मात्र, मित्राने मालकाला भाड्याचे पैसे न देता खोली रिकामी केली. घरमालकाने मध्यस्थी केलेल्या तरुणाकडे भाड्याचे पैसे मागत सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या अपमानामुळे तासाभरात तरुणाने घरी फॅनला साडीच्

.

महारुद्र बळीराम राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्र प्रदीप मापारी व त्याची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर परिसरातील बाबासाहेब बटुळे याची खोली भाड्याने मिळवून दिली होती. दरमहा २ हजार ८०० रुपये भाड्याची ही खोली प्रदीप व पल्लवी यांनी न सांगता व घरभाडे न देता रिकामी केली होती.

शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता बाबासाहेब बटुळे महारुद्रला सोबत घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या सलून दुकानात आला. त्याने भाड्याच्या पैशांबाबत जाब विचारला. या वेळी महारुद्रने संबंधितांकडून पैसे मागवून देतो, असे सांगितले. मात्र, बटुळे याने त्याचा मोबाइल हिसकावून घेत भाड्याची रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिली.

सर्वांसमोर अपमान केला

माझे सलून दुकान आहे. तेथे आरोपी बटुळे माझ्या भावाला घेऊन आला होता. त्याने सर्वांसमोर अपमानास्पद बोलत होता. तरी आम्ही त्यांना तुमचे पैसे घेऊन देतो, असे सांगत होतो. मात्र, बटुळे काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वडिलांच्या समोर त्याने तोंडाला येईल त्या भाषेत बोलणी केली. त्यामुळे भाऊ लगेच घरी गेला. आई गावाला गेलेली असल्याने घरी कुणीही नव्हते. काही वेळाने भाऊ गेल्यावर दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून डोकावून बघितल्यावर सर्व प्रकार समोर आला. – वीरभद्र राऊत, भाऊ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *