Headlines

पुण्यातील रेंजहिल्समध्ये दीड लाखांचा गांजा जप्त:एका तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल




पुण्यातील रेंजहिल्स परिसरातून खडकी पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत नीरज मलिक (वय २८, रा. सिद्धीविनायक सोसायटी, एनडीए रस्ता, शिवणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (१३ जून) मध्यरात्री पोलिसांचे पथक रेंजहिल्स परिसरात गस्त घालत असताना, फुटबॉल मैदानाजवळ मलिक एका पिशवीसह संशयास्पद स्थितीत थांबलेला दिसला. पोलिसांना पाहताच मलिक गडबडीत निघू लागला. संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी मलिकला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मलिक मूळचा जळगावचा रहिवासी आहे. त्याने हा गांजा कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबत खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्याकडून गांजासह मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड सिटी पोलिसांनी धायरी परिसरातून गांजा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक किलो ६४ ग्रॅम वजनाचा, सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. हा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा मूळचा बीडमधील आनंदनगरचा रहिवासी आहे. धायरीतील वारंगणी मळा रस्त्यावर तो गांजा घेऊन थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. पोलीस हवालदार संग्राम शिनगारे यांनी याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात गांजा सापडला. अल्पवयीनाकडून गांजा, पिशवी आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *