Headlines

पत्नीसोबत जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिले:निवृत्त बँक कर्मचाऱ्याकडून सैन्याला 25.51 लाख रुपये, मुलांची मिळाली खंबीर साथ




अनेकांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य हे आराम करण्याचे किंवा फिरायला जाण्याचे माध्यम असते. परंतु नागपूरचे ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून देशप्रेमाचा आदर्श ठेवला. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी म्हणजेच २५ लाख ५१ हजार रुपये “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केली. त्यांनी उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल नवतेज एस. सोहल (सेना पदक) यांच्याकडे हा २५.५१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या दानामागे एक भावुक, प्रेरणादायी कथा आहे. सहस्रबुद्धे यांनी ही रक्कम पत्नी अंजली यांच्या भविष्यासाठी बाजूला ठेवली होती. निवृत्तीनंतर पत्नीसोबत जग भ्रमंती करायची, असे त्यांचे स्वप्न होते. परंतु, श्रीकांत यांच्या निवृत्तीच्या अवघ्या ६ महिने आधीच त्यांच्या पत्नी अंजली यांचे निधन झाले. पत्नीच्या जाण्याने जग भ्रमंतीचे ते स्वप्न व इच्छा तिथेच संपली. मुलांची मिळाली खंबीर साथ श्रीकांत यांनी व त्यांच्या मुलांनी अंजली यांच्या निधनानंतर हा पैसा सत्कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांपेक्षा मोठे कार्य दुसरे काय असू शकते?, असे श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सांगितले. हा निधी “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’ मध्ये जमा झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *