![]()
शिकारीच्या शोधात असताना एक बिबट्या ४० फुट विहिरीत पडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे रविवारी सकाळी समोर आली. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब वन विभागाला कळवण्यात आली. विहिरीतील मोटरच्या पाइपला मिठी मारून बिबट्या बसला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुटका केली. गट क्रमांक १०१ मध्ये भाऊसाहेब मोईन यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे समोर आले. विहिरीवर गेलेले मोईन आणि बिबट्या यांच्यात अवघे ३० फुटांचे अंतर होते. त्यांनी भावासह पोलिस पाटील व ग्राम सुरक्षा यंत्रणेला माहिती दिली. विरगाव पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यास बाहेर काढले. विहिरीतूनच डरकाळी मोईन हे मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले होते. विहिरीतील पाण्याची पाहणी करण्यासाठी ते जवळ गेले असता विहिरीतून बिबट्याने डरकाळी फोडली. क्षणभर काय घडले हे न समजल्याने मोईन घाबरले. विहिरीच्या कट्ट्यावर बिबट्या बसलेला होता.
Source link
40 फुटांच्या विहिरीमधून बिबट्याची केली सुटका:हनुमंतगावला शिकारीच्या शोधात पडला विहिरीत