Headlines

भाजपसह राष्ट्रवादीचेही सर्व मतदार सहलीला जाणार ‘ठाण्या’मध्ये,:क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून संयुक्त उपाययोजना




नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीला अवघे चार दिवस उरले असताना, महायुतीमध्ये उडालेला बंडखोरीचा भडका अखेर शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले. मात्र, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, या भीतीने आता महायुतीने आपल्या मतदारांना ‘सहली’वर पाठवण्याचा सुरक्षित मार्ग निवडला आहे. शिवसेनेच्या महापालिकेतील २६ नगरसेवकांसह जिल्ह्यातील नगरपरिषदांचे सदस्य असे १०० हून अधिक सदस्य शनिवारीच ठाणे येथील रिसॉर्टवर पोहोचले आहेत, तर त्यापाठोपाठ सोमवारी (दि. १५) भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य सहलीसाठी ‘ठाण्या’ला जातील. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर भाजपच्याच दोन मातब्बर नेत्यांनी आव्हान उभे केल्याने महायुतीचा श्वास रोखला गेला होता. ही बंडखोरी शमवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरच चित्र स्पष्ट झाले आहे. या माघारीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे या तीन दिग्गज मंत्र्यांनी तब्बल आठवडाभर नाशिकमध्ये तळ ठोकला होता. त्यांच्या ‘ऑपरेशन नाशिक’ला यश आले असले तरीही ऐनवेळी दगाफटका बसू नये म्हणून मतदारांना सहलीला पाठविले जात आहे. भाजपचे सर्व सदस्य युतीधर्म पाळतील आणि एकही मत इकडे-तिकडे होणार नाही, असा दावा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला. दुसरीकडे, मत फुटणार नसल्याची खात्री असताना सहलीला का पाठविले जात आहे? असा प्रश्न खुद्द महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्येच उपस्थित केला जात आहे. मताचा भाव फुटेना; अस्वस्थता कायम माघारीच्या नाट्यानंतर अखेरीस महायुतीचा अधिकृत उमेदवार एकच रिंगणात राहणार असल्याने निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप लक्ष्मीदर्शन न झाल्याने व मताचा भाव न फुटल्याने अनेक मतदार सहलीला जाण्यासाठी तयारी दर्शवित नसल्याची चर्चा आहे. ‘बॅलेट पेपर’वर नावे कायम; दगाफटक्याची शक्यता दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात होता, मात्र भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्रसाद हिरे यांनी अचानक शड्डू ठोकल्याने दराडे अडचणीत सापडले होते. अखेरच्या टप्प्यात या दोन्ही बंडखोरांना शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या या दोन्ही उमेदवारांची नावे बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) तशीच राहणार आहेत. वरवर बंडखोरी शमल्याचे चित्र असले तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस पाहता, मतदानाच्या दिवशी ‘क्रॉस व्होटिंग’ (दगाफटका) होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *