Headlines

तुकाराम मुंढे यांची बदली करू नका:चांदूर बाजार काँग्रेसची तीन वर्षांसाठी मागणी




अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुढील तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी चांदूर बाजार तालुका ग्रामीण काँग्रेसने केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात गुटखा माफिया, भेसळखोर आणि बनावट औषधी रॅकेटविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. दूध, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही त्यांनी कठोर कारवाई केली आहे. यामुळे नागरिकांना शुद्धतेची हमी मिळत असून अनेक बेकायदेशीर धंदे बंद पडले आहेत. जनतेच्या ताटात विष कालवणाऱ्यांविरोधात निर्भिडपणे उभे राहणारे अधिकारी म्हणून मुंढे यांची ओळख आहे. अशा अधिकाऱ्याला राजकीय किंवा अन्य दबावाखाली हटवण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका तालुकाध्यक्ष किशोर देशमुख यांनी मांडली. यावेळी योगेश ईसळ, सचिन हिवराळे, निलेश डांगे, नंदुभाऊ पुंडकर, भूषण देशमुख, उमेश गवई, जितेंद्र मोहोड, भरत ढाकुलकर, प्रितम मानापुरे, तेजस वानखडे, अवधुत मातकर, विजय राऊत, रोशन शेकार, अंकुश धाकडे, गौरव वैद्य, अंकुश देशमुख आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *