Headlines

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस:रायगड, पुणे अन् साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी




राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी मात्र हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र अन् नाशिक घाट परिसरात मुसळधार उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. नाशिकच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पुणे व सातारा घाटमाथा परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’, तर कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या दरम्यान ताशी 30 ते 40किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *