Headlines

लासूर स्टेशन बसस्थानकाची चौकशी समितीकडून पाहणी:तक्रारीची दखल, आठवड्याभरात अहवाल सादर होणार‎




लासूर स्टेशन येथील बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारीवरून मंगळवारी चौकशी समितीने प्रत्यक्ष बसस्थानक स्थळाची पाहणी केली. समितीत अहिल्यानगर येथील अभियंता मंजुळे तसेच कनिष्ठ अभियंता दरेकर यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ, पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी बांधकामातील विविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. बसस्थानकाच्या इमारतीतील काही कॉलममध्ये भेगा पडल्याचे तसेच शेडसाठी वापरण्यात येणारे पत्रे व अँगल यांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय प्लंबिंग मटेरियल व काम, दरवाजे आणि इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामांमध्ये वापरण्यात आलेले साहित्यही हलक्या दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. दर्जेदार काम व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभम बोऱ्हाडे, युवक तालुकाध्यक्ष प्रदीप चव्हाण, अजीज पठाण, रिचर्ड बत्तीसे, शहराध्यक्ष किशोर पवार, शिवसेना उपशहर प्रमुख नितीन जाधव, भीमशक्तीचे रंजीत जाधव, भूषण रणयेवले आदींसह नागरिक उपस्थित होते. कॉलम, पत्रे, अँगलच्या गुणवत्तेची तपासणी अभियंता मंजुळे यांनी मंगळवारी बसस्थानक पाहणीचा सविस्तर अहवाल तयार करून पुढील ५ ते ६ दिवसांत कार्यकारी अभियंत्यांकडे सादर करण्यात येईल. तसेच कॉलम, शेडसाठी वापरलेली पत्रे व अँगल यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याबाबत अहवालात नमूद करण्यात येईल, असे आश्वासन पाहणी वेळी उपस्थितांना दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *