Headlines

करमाळा तालुक्यात 32 हजार हेक्टर ऊस:पावसाच्या ओढीने वाढली चिंता, एल निनोचा प्रभाव, पिक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती‎




एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंताग्रस्त अवस्थेत आलेला आहे .यावर्षी करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी करमाळा तालुक्यात उसाच्या लागवड क्षेत्रात ७९८५ हेक्टरने वाढ झाली आहे . परंतु लवकर पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे . पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आलेला आहे. खरीप हंगामामध्ये काही शेतकऱ्यांनी मुगाची व उडदाची पेरणी केलेली आहे . परंतु पाऊसच न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात करमाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस शेतकऱ्यांची उभी पिकेपाण्यामध्ये वाहून गेली होती. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे प्रमाणात नुकसान झाले होते .त्यातच आता नक्षत्रांचा पाऊस पडत नसल्यामुळे पुढच्या पिकाचे काय होईल त्यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे . त्यातच आता ऊस उत्पादक केळी उत्पादक ड्रॅगन फ्रुट उत्पादक तसेच खरीप हंगाम पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे आवर्तन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत फक्त पिण्यासाठीच पाणी साठा राखून ठेवण्यात आलेला आहे . त्यामुळे पाणी न मिळाल्यास लागण केलेल्या उसाचे आता काय होईल केळीचे काय होईल या चिंतेत शेतकरी पडलेला आहे . ड्रॅगन फ्रुट २०२५ – २६यावर्षी १५२ हेक्टरवर लागवड झाली आहे . ^एल निनो च्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर गेलेला आहे .शेतकऱ्यांनी पाचट टाकून व आपल्या ऊसाला व केळीच्या पिकाला ठिबक सिंचनाचा पूर्णपणे वापर करून पिकाला पाणी द्यावे . आणि येथून पुढे शेतकऱ्यांनी उसाची लागण करताना १००% टक्के ठिबक सिंचन वरच लागण करावी .खरीप हंगामासाठी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्या नंतरच खरीप हंगामाची पेरणी करावी त्या अगोदर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये . राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी करमाळा . ^गेल्या वर्षी आमचा ऊस अतिवृष्टीमुळे पाण्यामध्ये वाहून गेला होता .यावर्षी मोठ्या जोमाने आम्ही उसाची लागवड केली आहे परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे आम्ही लागण केलेल्या उसाचे आता काय होणार व खताच्या किमतीमध्ये ही वाढ झालेली आहे त्यामुळे आम्ही खूप चिंतेमध्ये आहोत . महादेव ढेरे, ऊस उत्पादक शेतकरी . वर्ष उस केळी खरीप २०२४ – २५ २४९६० २३९७२ ५०६१७ २०२५ – २६ ३२९५२ २०७६८ २४८१० दोन वर्षातील लागवड हेक्टरमध्ये खताच्या किंमतीत वाढ झाल्याने चिंता यावर्षी चांगल्या प्रमाणात ऊसाची व केळीची लागवड केली आहे .खर्च तर खूप झाला आहे . परंतु एल निनो च्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर पडल्यामुळे आम्हाला आता आमच्या पिकाचे काय होईल धास्ती याची लागून राहिली आहे, अशी माहिती केळी उत्पादक शेतकरी लखन महाडिक यांनी सांगितली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *