Headlines

पिंपरी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या:लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास




तालुक्यातील पिंपरी येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. दीपक बाळू देहाडे असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री दीपक निरगुडी बुद्रुक येथील गट क्रमांक ९५ मधील आपल्या शेतात गेला होता. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइक आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. रविवारी दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *