Headlines

गंगापूर येथील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जाधव बिनविरोध:निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला




तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या गंगापूर तालुका सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जगन्नाथराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी सौ. सुनीता कोटुवार, सचिवपदी संदीप शिरकुले, तर कोषाध्यक्षपदी मीरा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकनेते मधुकरराव वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेश हिवाळे आणि मावळते चेअरमन सतीश कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी चेअरमन जे.के. चव्हाण, संजय भडके, संतोष जाधव, लक्ष्मण उबाळे, प्रदीप जाधव, नारायण कोकरे, विनोद डिके, संतोष आळंजकर, सुनील जाधव, अनिल काळे, भगवान हिवाळे आणि कडुबा हारदे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व संचालक व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *