Headlines

दिव्य मराठी इम्पॅक्ट:दिल्लीगेट रस्त्यावर दुभाजकाला महापालिकेने बसवले रिफ्लेक्टर, उपमहापौरांच्या आदेशानंतर उपाययोजना‎




दिल्लीगेट रस्त्यावरील नव्याने उभारलेल्या दुभाजकामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने चारचाकी व दुचाकी वाहने त्यावर आदळत आहेत. याबाबत दिव्य मराठीने लक्ष वेधल्यानंतर उपमहापौर धनंजय जाधव यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली. त्यानंतर महापालिकेने सोमवारी दुभाजकाच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवले आहेत. गेल्या महिनाभरापासून या दुभाजकामुळे अपघात होत आहेत. दर दोन दिवसांनी अपघाताच्या घटना घडत आहेत. शनिवारी व रविवारी रात्रीही दोन वाहने दुभाजकावर आदळली. या संदर्भात दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली व प्रशासनाचे लक्ष वेधले. उपमहापौर धनंजय जाधव यांनी तत्काळ दखल घेत सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी या दुभाजकाच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *