![]()
ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र सुरू झाले आहे, त्यातूनच ते दिल्लीत उच्च पदावर जाणार या चर्चांना पूर्णविराम याच वागणुकीमुळे मिळाला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता देवेंद्र महाराष्ट्रात त्यांच्या पदावर राहतील की नाही असे वातावरण शिंदे गटामुळे निर्माण झाले आहे. संजय राऊत म्हणाले की, कायदा हा सत्ताधाऱ्यांसाठी नाहीच तो केवळ विरोधकांसाठीच आहे. कुठे आहे कायदा सत्ताधारी लोकांनी कितीही बलात्कार करावे कितीही लुटमार करावी, देश लुटावा. पक्षांतर करावी त्यांच्यासाठी कायदा नाहीच. कायदा फक्त भाजपविरोधात असणाऱ्या लोकांवर फास आवळण्यासाठी आहेत. पक्षांतर आणि भ्रष्टातंर करणाऱ्या टपोरी लोकांना पदावर बसवून त्यांना काही तरी प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. एका पक्षात निवडून येत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांवरील खटले प्रलंबित आहे, तरीही त्यांना सभापती, उपसभापती, मंत्री करणार असाल तर काय फायदा आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे का? संजय राऊत म्हणाले की, नसरापूर प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली यामध्ये सरकारचे काही कर्तृत्व आहे असे मला वाटत नाही. नसरापूरमध्ये बालिकेवर अत्याचार झाला तिची हत्या करण्यात आली त्यानंतर जो जनतेचा रोष उसळला त्यामुळे अत्यंत वेगवान पद्धतीने हा खटला चालला आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली. पण राज्यात कायद्याचा धाक असता तर ही गोष्ट झालीच नसती ती मुलगी आज जिंवत असती. अशा अनेक घटना राज्यात घडत आहेत, त्या घडल्यावर आपण आणि सरकार जागे होते. शत जर काही सुधारणा होणार नसेल तर त्या मुलीचे बलिदान वाया गेले असे म्हणावे लागेल. राज्यात कायद्याचे राज्य आहे असे वातावरणच नाही. सर्वच ठिकाणी हे सुरू आहे. पेपरफुटीशी संबंधित लोकं भाजपचे संजय राऊत म्हणाले की, राज्यात पेपरफुटी होत आहे हे सर्व लोकं भाजपशी संबंधित आहेत. नीट पेपर असो सीईटी असो की टीईटी सर्व पेपर फुटीमागे भाजपचे कार्यकर्त्यांसह नाते असणाऱ्या लोकांपर्यंतच पोहोचत आहेत, हा विषय अतिशय गंभीर आहे. जो पक्ष रामद्रोह करत राममंदिरातील पेट्याचा अपहार करतो त्याच पक्षाचे लोकं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. रावणामध्ये अनेक वाईट गुण होते पण त्याने कधीही दानपेटी लुटली नाही. पण हे स्वत:ला रामभक्त म्हणवतात त्यांनी गेल्या काही महिन्यात 66 वेळा दानपेट्या लुटल्या. इतक्या वेळा तर महमूद गझनीने सुद्धा लुटले नाही. भाजपने अयोध्येतील राममंदिर 66 वेळा लुटले, यांची नोंद इतिहासात झाली पाहिजे.
Source link
फडणवीसांचे वागणे 'घटनाद्रोही' अन् 'रामद्रोही; म्हणूनच 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही, अशी परिस्थिती– संजय राऊत