![]()
राज्यात बनावट जीवनरक्षक इंजेक्शन्स व औषधांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या नावाने बनावट ‘अल्ब्युरेल’ इंजेक्शन विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचे गांभी
.
बनावट औषधांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी औषध नियमांनुसार प्रायमरी पॅकेजिंगवर ‘क्यू आर कोड’ असणे बंधनकारक केले आहे. आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, चित्रा वाघ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना झिरवाळ यांनी ही माहिती दिली. पुणे येथील मैत्री फार्मास्युटिकल्स व श्रीराम हेल्थकेअर येथे अल्ब्युरेल २० टक्के इंजेक्शनचा साठा बनावट असल्याचे लॅब रिपोर्टमध्ये उघड झाले. नागपूरच्या हितांशी फार्मास्युटिकल्सवरील छाप्यातही असाच बनावट साठा आढळला.
मकोका लागल्यास आरोपींना जामीन कठीण
मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) हा प्रामुख्याने संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी वापरला जातो. यात आरोपींना जामीन मिळणे अत्यंत कठीण असते आणि शिक्षाही कठोर असते. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बनावट औषधांच्या प्रकरणात मकोका लागल्यास या रॅकेटला मोठी चपराक बसेल आणि गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होईल.