![]()
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खानसह दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आता ६ जुलै रोजी निर्णय होणार आहे. निर्णय पुढे ढकलल्याने तिघांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. बहुचर्चित आणि खळबळजनक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांनी नाशिक रोड न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. त्यावरील निर्णयाासाठी ६ जुलै ही तारीख दिली आहे. उपचाराकरिता जामिनाची मागणी निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, निदा गरोदर असल्याने तिला उपचाराची गरज असल्याचा मुद्दा मांडत जामीन मिळण्याची विनंती न्यायालयात केली आहे. तर दुसरीकडे, सरकार पक्षाने निदासह इतर संशयितांना जामीन मिळाला, तर ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात, पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा प्रतिवाद केला आहे.
Source link
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:कॉर्पोरेट जिहाद, निदा खानसह दानिश, तौसिफच्या जामिनावर 6 जुलैला निर्णय