Headlines

शेती, आरोग्य ही देशाच्या प्रगतीची दोन मजबूत चाके- डॉ.व्हलेरियन फर्नांडिस:पैठण येथे रोटरी क्लबतर्फे प्रगतिशील शेतकरी, डाॅक्टरांचा गौरव‎




कृषी दिन आणि डॉक्टर्स डेचे औचित्य साधून रोटरी क्लब पैठणच्या वतीने बुधवारी पैठण औद्योगिक वसाहतीतील सेंट पॉल्स मिलन हॉल येथे प्रगतिशील शेतकरी आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे ट्रेनर तथा सेंट पॉल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक रो. डॉ. व्हलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते नानेगाव येथील युवा शेतकरी बाळासाहेब माने, मुधलवाडी येथील प्रगतशील शेतकरी विष्णू बोडखे, शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल चंद्रशेखर पाटील तसेच पैठण येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भारत झारगड व डॉ. सखुबाई झारगड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. फर्नांडिस म्हणाले, शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून डॉक्टर हे समाजाचे आरोग्यरक्षक आहेत. या दोन्ही घटकांच्या अथक परिश्रमामुळे समाज सक्षम आणि निरोगी राहतो. शेती आणि आरोग्य ही देशाच्या प्रगतीची दोन मजबूत चाके आहेत. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी आहे. अशा उपक्रमांमुळे कर्तृत्वाला प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक संदेश जातो. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष गोपाळ जगताप, सचिव पवन लोहिया, उपाध्यक्ष बळराम लोळगे, चंद्रशेखर पाटील, बाळासाहेब माने, डॉ. डॅनियल इंगळे, रघुनाथ चन्ने, गजानन आवारे, जालिंदर फलके, जयराज चव्हाण यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *