व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, ते 3 जुल
.
केतनला ढकलण्यापूर्वीच फोन सियाच्या हातात कसा आला?
लोहगडावर केतनला 350 फूट खोल दरीत ढकलण्यात आले, मात्र त्याचा मोबाईल फोन सियाकडे सुरक्षित कसा राहिला, हा पोलिसांच्या तपासातील सर्वात मोठा प्रश्न आहे.
डेटा डिलीट केल्याचा संशय: केतनचे कुटुंबीय लोहगडावर पोहोचण्यापूर्वी काही काळ हा फोन सियाकडेच होता. नंतर तिने तो कुटुंबीयांकडे दिला. मात्र, हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून या मधल्या वेळात सियाने केतनच्या फोनमधील महत्त्वाचे चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डेटा डिलीट केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
डिजिटल फॉरेन्सिक: हा फोन आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला असून, डिलीट झालेला डेटा रिकव्हर झाल्यानंतर हत्येचे महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.
‘सिया जमिनीवर बसली’, आणि चेतनने केतनला ढकलले?
लोणावळा पोलिसांनी लोहगडावर आरोपी चेतन चौधरीला नेऊन ‘क्राइम सीन री-क्रिएशन’ (गुन्ह्याची पुनर्रचना) केले. यावेळी चेतनने हुडी घातलेली होती आणि त्याने डमी पुतळा दरीत ढकलून घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
ठरलेला सिग्नल: हत्येसाठी सिया आणि चेतनने आधीच एक ‘सिग्नल’ ठरवला होता. निर्जन ठिकाणी पोहोचताच सिया जमिनीवर बसली (हाच तो सिग्नल होता), आणि दबा धरून बसलेल्या चेतनने वेगाने येऊन केतनला दरीत ढकलले, अशीही शक्यता आहे.
ट्रॅकिंग टाळण्यासाठी चेतनची चलाखी
हा खून पूर्वनियोजित होता, हे चेतनच्या आणखी एका कृतीतून स्पष्ट होते. मोबाईल लोकेशनवरून आपण ट्रॅक होऊ नये, यासाठी हत्येच्या दिवशी चेतनने स्वतःचा फोन घरीच ठेवला होता आणि दुकानातील एका कर्मचाऱ्याचा फोन तो सोबत घेऊन गेला होता.
कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? संशयाची सुई कोणाकडे?
सर्वात मोठी बाब म्हणजे, या हत्येच्या कटात सिया आणि चेतनव्यतिरिक्त आणखी कोणाचा तरी सहभाग आहे का? असा संशय पोलिसांना आहे. न्यायालयात कोठडी वाढवून मागताना पोलिसांनी या अँगलने तपास करायचा असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, तिचे आई-वडील, लग्न ठरवणारे मध्यस्थ (मित्तल दाम्पत्य) आणि कॅब ड्रायव्हर यांचे जबाब नोंदवले आहेत.
केतनशी सियाला लग्न करायचे नव्हते, हे तिचा भाऊ साहिलला आधीच माहीत होते. मग फूड मॉलवर जेव्हा केतनचा पासपोर्ट गायब झाला (जो सियाने फाडला होता), तेव्हा साहिलला संशय का आला नाही? की त्याने तो संशय जाणीवपूर्वक लपवला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
वकिलांची भूमिका
चेतन चौधरीचे वकील ऋषिकेश उत्तरवार यांनी म्हटले आहे की, “हे सर्व सध्या केवळ आरोप आहेत. ते सिद्ध करण्यासाठी पोलिसांना न्यायालयात ठोस पुरावे सादर करावे लागतील. बचाव पक्ष म्हणून आम्ही पोलिसांच्या पुराव्यांमधील त्रुटींची तपासणी करू.” आता सिया आणि चेतनच्या उरलेल्या पोलीस कोठडीत, या हत्येमागे आणखी कोणता ‘मास्टरमाइंड’ किंवा मदतनीस आहे का, हे शोधण्याचे मोठे आव्हान लोणावळा पोलिसांसमोर आहे.
संबंधित बातम्या वाचा…
लोहगडवरील हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा:14 जूनलाही झाला होता केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न! वडिलांचे गंभीर आरोप

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, केतनला मिठी मारून वेळ मारून नेली होती. हा धक्कादायक खुलासा खुद्द केतनच्या वडिलांनी केला असून, या कटात सियाचे कुटुंबीय देखील सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. येथे वाचा सविस्तर
केतन अग्रवाल हत्याकांड:सिया-चेतनचा पुण्यात घराशेजारीच हत्येचा सराव; केतनचा मोबाइल रिकव्हरीसाठी फॉरेन्सिककडे
केतन अग्रवालच्या निर्दयी हत्येपूर्वी आरोपी सिया आणि चेतनने पुण्यातच त्याला दरीत ढकलण्याचा सराव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ कोठडीत चेतनला रडू कोसळत आहे, तर सिया तपासात असहकार करत आहे. हत्येनंतर सियानेच केतनचा मोबाइल त्याच्या वडिलांना दिल्याने त्यांचा संशय बळावला होता. पुरावे नष्ट केल्याच्या संशयावरून डेटा रिकव्हरीसाठी मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. येथे वाचा सविस्तर
