Headlines

चंद्रपुरातील धक्कादायक घटना:नवजात बाळ विक्रीप्रकरणी भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; दोघीही आमदार जोरगेवारांच्या समर्थक असल्याची चर्चा




पैशांच्या हव्यासापोटी एका जन्मदात्या मातेनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली होती. आता या मानवी तस्करी आणि बाळ विक्री प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. बुधवारी या दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नवजात बालकाच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि इतर बेकायदेशीर प्रक्रियांमध्ये मदत केल्याचा या दोन्ही महिलांवर आरोप आहे. सायली येरणे या भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री, तर भाग्यश्री हांडे या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही महिला आमदार किशोर जोरगेवार यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. जोरगेवार हे अपक्ष आमदार असल्यापासून त्यांनी स्थापन केलेल्या ‘यंग चांदा ब्रिगेड’ या संघटनेच्या त्या सक्रिय पदाधिकारी राहिल्या आहेत. नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल अटक करण्यात आलेल्या या दोन्ही महिलांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे विविध मंत्री, पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा अधिकच गडद झाली आहे. काय आहे हे प्रकरण? रामनगर पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून एका अत्यंत क्रूर आणि अमानुष गुन्ह्याची साखळी उघडकीस आली आहे. संबंधित पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईचे मुख्य आरोपी अजय फुलझेले याच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. याच नराधम अजयने महिलेच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, ज्यातून ती गर्भवती राहिली. हे भयंकर कृत्य दडपण्यासाठी आणि मुलीची ओळख लपवण्यासाठी आरोपीने थेट त्या अल्पवयीन मुलीचे मुंडन केले होते. या मुलीची नागपूर येथे प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बदनामी टाळण्यासाठी आणि पैशांच्या मोहापायी आईनेच प्रियकर अजय फुलझेले याच्या साथीने नवजात बाळाची विक्री करण्याचा कट रचला. ‘झिरो एफआयआर’ने केला पर्दाफाश नागपूरमध्ये दाखल झालेल्या ‘झिरो एफआयआर’च्या माध्यमातून हे प्रकरण रामनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर महिनाभराच्या तपासाअंती या मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक केली असून, सर्वांवर पॉक्सो (POCSO) आणि मानवी तस्करीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अजय फुलझेले, पीडित मुलीची आई जिने बाळाचाही सौदा केला, नवजात बाळाची खरेदी करणाऱ्या दोन महिला सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना अटक झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *