Headlines

आरोग्य अन् आनंदी जीवनासाठी आयुर्वेद सर्वोत्तम जीवनशैली:आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांचे प्रतिपादन




हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले आयुर्वेद शास्त्र हे सुरक्षित, परिणामकारक आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि व्यक्ती सुदृढ, निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा अधिकाधिक अंगीकार करून त्याचा समाजात व्यापक प्रसार आणि प्रचार करण्याचा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून जीवन जगण्याची योग्य शैली आहे. आयुर्वेदामुळे शारीरिक व मानसिक व्याधींपासून दूर राहून उत्तम आरोग्य प्राप्त करता येते, असे प्रतिपादन आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांनी केले. आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन आयोजित सर्वसाधारण सभा शेखर खोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सेक्रेटरी चंद्रकांत भुसारी, उपाध्यक्ष अभिजीत दुबल, अरुण चौधरी, मुरलीधर कातोरे, स्वप्निल शहा यांच्यासह राज्यभरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान औषध व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० आणि नियम १९४५ या महत्त्वपूर्ण विषयावर औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त जावेद शेख, औषध निरीक्षक मुळे तसेच लॉ कॉलेजचे प्राचार्य एम.एम. तांबे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. बोरुडे म्हणाले, असोसिएशनच्या नियमावलीत आवश्यक बदल करणे, राज्यभर आयुर्वेदाचा व्यापक प्रसार-प्रचार करणे, आयुर्वेदाबाबत जनजागृती वाढविणे यांसह विविध महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आधुनिक उपचारपद्धतींच्या काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मात्र आयुर्वेद ही नैसर्गिक, सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदामुळे जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडतो, ताणतणाव कमी होतो आणि निरोगी, आनंदी जीवन जगण्यास मदत मिळते. असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय आयुर्वेद महोत्सव दरवर्षी उत्साहात आयोजित केला जात असून सभासदांना केंद्रस्थानी ठेवून संघटना अधिक सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू आहे, असे बोरुडे यांनी सांगितले. यावेळी सचिव चंद्रकांत भुसारी यांनी संघटनेचा आर्थिक अहवाल व विविध उपक्रमांची माहिती सादर केली. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होणे काळाची गरज समाजामध्ये आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार होणे ही काळाची गरज असून ग्राहकांपर्यंत आयुर्वेद शास्त्र पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी सभासदांवर आहे. आयुर्वेद हे प्राचीन आणि शास्त्रीय ज्ञान असून ते आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *