Headlines

माथेरानच्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा:दस्तुरी येथील 22 हजार चौ.मी. जागेवर वाहनतळ, भूखंड महसूल विभागाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरित




प्रसिद्ध माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची वाहनतळाची मोठी समस्या आता कायमची सुटणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने आज ( दि. ३ जुलै ) रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करून या जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी दिली आहे. मौजे माथेरान (दस्तुरी), ता. कर्जत, जि. रायगड येथील भूखंड क्र. ९३, सीटीएस नं. ३ मधील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाची ही शासकीय जमीन आता माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने, पूर्णपणे विनामूल्य (भोगाधिकार मूल्यरहित) आणि महसूल मुक्त किंमतीने नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात येत आहे. वर्ग २ च्या शासकीय अटी शर्तीनुसार हा भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने तिथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी नाक्यावरच पार्क करावी लागतात. सुट्ट्यांच्या काळात तिथे जागेअभावी वाहनांच्या प्रचंड रांगा लागत असत. आता तब्बल २२ हजार चौरस मीटरहून अधिक जागा पार्किंगसाठी मिळाल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार असून माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. हे ही वाचा… स्मार्ट मीटरवरून विधानसभेत खडाजंगी:सरकारने म्हटले- राज्यात सर्वांसाठी अनिवार्य, प्रीपेड मीटर ऐच्छिक; नाना पटोले म्हणाले- सरकारचा स्मार्ट दिखावा, ही जनतेची थेट लूट राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही जनतेची लूट करणारे खोटे बोलणारे सरकार आहे,” असा घणाघात पटोले यांनी केला. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाचे आमदार नितेश राणे यांनीही ग्रामीण भागात स्मार्ट मीटरवरून प्रचंड असंतोष असून, “अधिकारी कधीही मार खातील,” असा इशारा देत घरचा आहेर दिला. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे आणि भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत ही चर्चा झाली. सविस्तर वाचा… पावसाळी अधिवेशन:इंद्रायणी प्रदूषणावरून नाना पटोले आक्रमक, हत्ती-कुत्र्यांच्या हैदोसावर चर्चा; सरकारकडून उपाययोजनांचे आश्वासन राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले होते. मात्र, गदारोळ शमल्यानंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून, चंद्रपूर-गडचिरोलीतील रानटी हत्तींचा हैदोस, जालन्यातील भटक्या कुत्र्यांचे हल्ले, कंत्राटदारांचे सेफ्टी ऑडिट आणि ‘बेस्ट’ उपक्रमाला आर्थिक मदतीचा मुद्दा आमदारांनी आक्रमकपणे मांडला. सविस्तर वाचा… ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत मोठी चर्चा:शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीवर बंदीचे आदेश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एंट्री राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. या चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *