Headlines

23 terrorists declared, including Musaddiq, who carried out the raid on Shri Ram temple, including 17 Pakistanis, 6 Indians


  • Marathi News
  • National
  • 23 Terrorists Declared, Including Musaddiq, Who Carried Out The Raid On Shri Ram Temple, Including 17 Pakistanis, 6 Indians

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तान आणि पीओकेमधून भारतविरोधी नेटवर्क चालवणाऱ्या २३ दहशतवाद्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आरएसएस मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी मोहंमद मुसद्दिक याचाही समावेश आहे. याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज मोहंमद सईदचा जावई हाफिज वलीद याच्या नावाचाही समावेश आहे.

या यादीत १७ पाकिस्तानी व ६ भारतीय आहेत. हे सर्वजण पाक किंवा पीओकेमधून दहशत पसरवत आहेत. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, सरकार दहशतवादाविरुद्ध ‘झीरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत आहे.

पाकिस्तान किंवा पीओकेमधून दहशत पसरवताहेत

याशिवाय यादीत समाविष्ट असलेले ६ भारतीय नागरिकही सध्या पाकिस्तान किंवा पीओकेमधून दहशतवादी कारवाया चालवत असल्याचा आरोप आहे. फिरदौस अहमद भट, हारून रशीद गनई, बिलाल अहमद मीर, आबिद कय्युम लोन, नजीर अहमद गुज्जर आणि ओवेस फारूज अशी त्यांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणे, घुसखोरीत मदत, दहशतवाद्यांची भरती, शस्त्रे आणि दारूगोळा पोहोचवणे यासारखे गंभीर आरोप आहेत.

हाफिजचा जावई वलीदही यादीत

मोहंमद मुसद्दिक : जैशचा दहशतवादी. श्रीराम मंदिर, नागपूर येथील संघ मुख्यालय आणि पानिपत रिफायनरीची रेकी, घुसखोरी, ड्रोनने शस्त्रे पाठवल्याचा आरोपी. हाफिज खालिद वलीद : हाफिज सईदचा जावई, २०१६ च्या पंपोर हल्ल्याचा मास्टरमाइंड, लष्करचा म्होरक्या. अब्दुल रौफ: आंतरराष्ट्रीय फंडिंगचा आरोपी. मोहंमद असगर खान: नगरोटा लष्करी तळ हल्ल्याचा कट रचणारा; दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली. जैशशी संबंधित. हाफिज अब्दुल शकूर: जैशचा दहशतवादी, घुसखोरीत मदत. मौलाना इमदाद मक्की : २०१६ च्या पठाणकोट एअरबेस हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.अशफाक अहमद: फंडिंग, तांत्रिक मदतीचा आरोप. फिरदौस अहमद भट: घुसखोरी, शस्त्रे पोहोचवणे आणि लष्करसाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती केली. बिलाल अहमद मीर: लष्कर, टीआरएफशी संबंधित. काश्मीरमध्ये लॉजिस्टिक्स नेटवर्क आहे. मोहंमद शाहिद फैसल : बेंगळुरू, नांदेड, रामेश्वरम कॅफे व अल-हिंद आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणांमध्ये ऑनलाइन हँडलर असल्याचा आरोपी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *