Headlines

Pune Tempo Submerged Tunnel Rescue; Traffic Police Save Driver


मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असताना सोमवारी दुपारी बोपोडी परिसरात थरारक घटना घडली. पाण्याने भरलेल्या भुयारी मार्गात एक टेम्पो शिरल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प

.

साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट भुयारी मार्गात

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता परिसरातील जुन्या मुंबई–पुणे मार्गावरील भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास लोखंडी बॅरिकेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता.

या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे आणि नितीन कारले बंदोबस्तासाठी तैनात होते. ते वाहनचालकांना भुयारी मार्गातून जाऊ नये, अशा सूचना देत होते.

बंद काचांमुळे सूचना ऐकू आल्या नाहीत

याचदरम्यान चालक राहुल पाटोळे हे टेम्पो घेऊन तेथे आले. मुसळधार पावसामुळे टेम्पोच्या काचा पूर्णपणे बंद असल्याने त्यांना पोलिसांच्या सूचना ऐकू आल्या नाहीत. त्यांनी टेम्पो थेट पाण्यात उतरवला.

भुयारी मार्गातील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने काही क्षणांतच टेम्पो नियंत्रणाबाहेर जाऊन वाहू लागला. परिस्थिती गंभीर होताच चालकाने काच उघडून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान

चालकाचा आवाज ऐकताच पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे आणि नितीन कारले यांनी तात्काळ धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोराच्या साहाय्याने त्यांनी चालकाला सुरक्षित बाहेर काढले.

यानंतर हायड्रॉलिक यंत्राच्या मदतीने पाण्यात अडकलेला टेम्पोही बाहेर काढण्यात आला. या संपूर्ण कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.

वरिष्ठांकडून पोलिसांचे कौतुक

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दोन्ही पोलिसांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले. योग्य वेळी केलेल्या बचावकारवाईमुळे चालकाचा जीव वाचल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. काही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने अनेक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

याआधी वाघोली–लोहगाव रस्त्यावरही एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली होती. पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने त्या बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली होती.

वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पावसामुळे शहरातील अनेक भुयारी मार्ग आणि सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यातून वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत, तेथे प्रवेश करू नये. प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा…

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय

पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. येथे वाचा संपूर्ण बातमी

पूरग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय!:पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी; राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था

आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हजारो वारकरी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेत शहरातील महापालिकेच्या 101 शाळा वारकऱ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आजपासून थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.