![]()
मुंबईतील पवई तलाव परिसरात मगरींचा वावर नवीन नाही, मात्र जेव्हा ही मगर थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, तेव्हा काय परिस्थिती ओढवते, याचा थरारक अनुभव रविवारी स्थानिकांनी घेतला. पवई तलावाजवळील मोरारजी नगर परिसरात चक्क ७ फूट लांबीची महाकाय मगर भरवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. येथील एका दर्ग्याबाहेर ही मगर आढळून आल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या घटनेचा आणि मगरीच्या रेस्क्यूचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. भरवस्तीत मगर, नागरिकांमध्ये दहशत मिळालेल्या माहितीनुसार, मोरारजी नगरमधील एका दर्ग्याबाहेर ही महाकाय मगर अचानक आढळून आली. मगरीला पाहताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि एकच धावपळ उडाली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. वनविभाग आणि रेस्क्यू टीमची मोठी कारवाई घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरी बाळगत, मगरीला कोणतीही इजा न पोहोचवता तिला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आले. या संयुक्त मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे. मगरीची प्रकृती स्थिर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या मगरीला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मगरीची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही वैद्यकीय तपासणी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तिला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हेही वाचा.. मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन १६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर वाचा नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
मुंबईत भरवस्तीत शिरली 7 फुटांची महाकाय मगर – VIDEO:पवई तलावाजवळ उडाली खळबळ, पाहा थरारक रेस्क्यू