Headlines

‘भगवान श्री ऋषिश्वर महाराज’ यांच्या आरतीचा प्रकाशन सोहळा उत्साहात:एकपाळा येथे आयोजन, आरती म्हणजे ऋषीश्वर महाराजांच्या भक्तीची साद‎



जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्रिवेणी संगम एकपाळा येथे एका भक्तीमय आणि अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ शुद्ध एकादशी (निर्जला एकादशी) च्या पवित्र पर्वावर २५ जून रोजी, या क्षेत्राचे आराध्य दैवत भगवान श्री ऋषि

.

त्रिवेणी संगम एकपाळा गावी भगवान श्री शंकराचे प्राचीन शिवालय असून, येथे भगवान शिवाला भगवान श्री ऋषिश्वर महाराज या नावाने पुजले जाते. दरवर्षी पौष वद्य अष्टमी ते पौष वद्य अमावस्या या कालावधीत येथे यात्रा भरते. येथे भाविक दर्शनासाठी येतात. हे स्थान तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेले असून, येथे अष्ट तीर्थयोग वैभवाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. ही हृदयस्पर्शी आरती प्रीतम उर्फ पांडुरंग भीमराव झोंबाडे महाराज (श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ, तीर्थक्षेत्र सोनारखेड, ता. भातकुली, जि. अमरावती, भक्ती सुधा विश्व कल्याण सेवा समिती, अमरावती) यांनी रचली आहे.

“आरती करो ऋषिश्वर की, त्रिविध ताप हर की, सर्वसुख कर की…” या आरतीच्या माध्यमातून लेखकाने त्रिवेणी संगमाचे सौंदर्य, अष्ट तीर्थयोग वैभव आणि महाराजांच्या अगाध महिमेचे सुंदर वर्णन केले आहे. “ही आरती केवळ शब्द नसून, भगवान ऋषिश्वर महाराजांच्या शक्तीची आणि भक्तीची साद आहे. जो भाविक ही आरती मनापासून आरती म्हणेल, त्याला निश्चितच आध्यात्मिक शांती लाभेल,” असा विश्वास लेखक प्रीतम महाराजांनी व्यक्त केला. भगवान श्री ऋषिश्वर महाराज संस्थानच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात आरतीचे अधिकृत प्रकाशन ह.भ.प. श्री सुरेश महाराज काळमेघ (श्री सच्चिदानंद नालसाहेब महाराज संस्थान तथा भगवान श्री ऋषिश्वर महाराज संस्थान, त्रिवेणी संगम एकपाळा) श्री कैलास महाराज राऊत (एलकीपूर्णा) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना संस्थानच्या वतीने आरतीच्या प्रतींचे मोफत वितरण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील असंख्य भाविक, वारकरी संप्रदायातील नागरिक आणि संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकतेचा भक्तीसंगम भगवान ऋषिश्वर महाराजांच्या आरतीचा प्रकाश सोहळा हा सर्व आस्था असलेल्या भाविकांसाठी भक्तीचा संगम ठरला. याप्रसंगी सामाजिक एकतेचाही परिचय आला. सर्वच जातीतील भाविक उपस्थित होते. सर्वांनी एका ताला, सुरात आरती गाऊन विशेष आध्यात्माचा परिचय दिला. आरतीच्या नादामुळे जणू भाविक परब्रम्हात लीन झाले की काय असे वाटत होते.

आरतीचे सामूहिक गायन मुख्य आकर्षण ठरले कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे उपस्थितांनी महाराजांच्या जयघोषात केलेले आरतीचे प्रथम सामूहिक गायन. या सुमधूर आणि भक्तीमय सुरांनी संपूर्ण एकपाळा परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना भक्तीच्या,अध्यात्माच ्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. हा एक आनंददायी सोहळा तर ठरलाच शिवाय अनेकांनी आरती मुखपाठही केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *