Headlines

लॉरेन्स बिश्नोई गँगला FBI चा दणका:अमेरिका ते युरोपपर्यंत 'ऑपरेशन हार्ड बॉल'; 24 जणांना बेड्या, पुण्यातही 4 गजाआड




अमेरिकेची प्रमुख तपास संस्था असलेल्या एफबीआयने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या जागतिक सिंडिकेटविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि समन्वित कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये धाडी टाकून तब्बल २४ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या, खंडणी, ड्रग्ज तस्करी आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या नेटवर्कचे कंबरडे मोडण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ५० हून अधिक ठिकाणी छापे अमेरिकेतील कॅलिफोर्निया, इंडियाना, जॉर्जिया तसेच कॅनडा आणि स्पेनमध्ये ५० हून अधिक सर्च वॉरंट बजावण्यात आले. ३७ जणांवर आरोप निश्चित तीन वेगवेगळ्या फेडरल आरोपपत्रांमध्ये ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी २४ जणांना अटक झाली आहे, तर १० जण अद्याप फरार आहेत. लॉरेन्स बिश्नोई मुख्य आरोपी भारतातील तुरुंगात बसून ग्लोबल सिंडिकेट चालवल्याचा बिश्नोईवर अमेरिकेत ठपका. तुरुंगातून चालवली ‘ग्लोबल’ गुन्हेगारी अमेरिकन न्याय विभागाच्या माहितीनुसार, तीनपैकी एक प्रमुख आरोपपत्र थेट लॉरेन्स बिश्नोईवर केंद्रित आहे. अमेरिकन वकिलांनी आरोप केला आहे की, बिश्नोईने भारतातील एका तुरुंगातून प्रतिबंधित मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपले जागतिक गुन्हेगारी साम्राज्य चालवले. त्याने अनेक देशांमध्ये राजकीय हत्या, अपहरण, मानवी तस्करी आणि ड्रग्जचा काळाबाजार घडवून आणला. गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा रडारवर या आरोपपत्रात बिश्नोईचे प्रमुख साथीदार म्हणून गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांचीही नावे आहेत. गोल्डी ब्रार या सिंडिकेटचा ‘उत्तर अमेरिका प्रमुख’ म्हणून काम पाहत होता, तर रोहित गोदारा याने युरोपमधील कारवायांवर नियंत्रण ठेवले होते. या दोघांनी भारताबाहेर गँगच्या कारवाया वाढवण्यात मुख्य भूमिका बजावली. विशेषतः भारतीय वंशाच्या नागरिकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हिंसेचा वापर केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दहशत पसरवली. कॅनडामधील हत्येचे धागेदोरे जून २०२३ मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया (सरे) येथे एका प्रमुख राजकीय आणि धार्मिक नेत्याची हत्या झाली होती. या हत्येचे आदेश बिश्नोई आणि ब्रार यांनीच दिले होते, असा ठपका अमेरिकन वकिलांनी ठेवला आहे. जरी हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे असले, तरी या प्रकरणाला आता मोठे आंतरराष्ट्रीय वळण लागले आहे. अशी चालायची खंडणी आणि तस्करी गुन्हेगारी टोळीचे सदस्य व्हॉट्सॲप सारख्या मेसेजिंग ॲपचा वापर करून परदेशातील भारतीयांना धमक्या देत असत. त्यांच्याकडून लाखो डॉलर्सची खंडणी मागितली जात असे. एवढेच नाही, तर या गँगने प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून कोकेनची खेप चोरून अमेरिका आणि कॅनडामध्ये ड्रग्जची मोठी तस्करी केल्याचाही आरोप आहे. इतर दोन भारतीय गँगवरही एफबीआयची नजर बिश्नोई व्यतिरिक्त आणखी दोन गुन्हेगारी टोळ्यांवर अमेरिकेने कारवाई केली आहे: जग्गू भगवानपुरिया सिंडिकेट ही भारतातील आणखी एक मोठी गँग असून, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत तिचे जाळे पसरले आहे. हत्या आणि शस्त्र तस्करीसोबतच, भारतातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रतिस्पर्ध्यांना संपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रविंदर सिंग धांदा नेटवर्क कॅनडातून चालणाऱ्या या नेटवर्कवर ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे. या गटाने दक्षिण कॅलिफोर्नियातून कॅनडात शेकडो किलो कोकेन आणि मेथाम्फेटामाइनची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. हेही वाचा.. पुण्यात बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त, चार गजाआड पुणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या कुख्यात बिश्नोई गँगच्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य गोळीबार करणाऱ्या दोघांसह एकूण ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सलग १५ दिवस पाच राज्यांमध्ये पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा आरोपी पवनकुमार याला तीन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा मुख्य आरोपी रविकुमार याला एका अल्पवयीन साथीदारासह पंजाबमधील भटिंडा येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच, या आरोपींना पुण्यात स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या सत्यप्रकाशलाही पोलिसांनी गजाआड केले आहे. हे आरोपी मूळचे हरियाणा आणि राजस्थानचे रहिवासी असून पूर्वी ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात एका स्टील कंपनीत काम करत होते. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *