![]()
कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याशिवाय मराठवाडा, विदर्भातील अनेक छोट्या दिंड्या कुर्डुवाडी व परिसरातून दररोज जाणार आहेत. या दिंड्यांमधील वारकऱ्यांना कुर्डुवाडीतील विविध मंडळांकडून भोजनाची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर नागरिकांनी दिंड्यांमधील वारकऱ्यांना अगत्याने घरी भोजनासाठी घेऊन जाण्याची परंपरा सुरू ठेवलेली आहे. रुक्मिणी मातेच्या माहेराहून येणारी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते पंढरपूर दिंडी, संत एकनाथ महाराज पैठण, संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई पालखी, संत निळोबाराय महाराज पालखी व संत गहिनीनाथ महाराज पालखी, बाळाभाऊ पितळे महाराज मेहकर ते पंढरपूर या प्रमुख सात पालख्यांचा यात समावेश आहे. . श्री संत एकनाथ महाराज पालखी : सोलापूर जिल्ह्यात मुंगशी येथून आगमन होते. माढा तालुक्यातील बिटरगाव, कुर्डू व अरण या ३ ठिकाणी मुक्काम असतो. . संत मुक्ताबाई : या सोहळ्याचा माढा येथे मुक्काम असणार आहे. . संत निवृत्तीनाथ महाराज पालखी : माढा तालुक्यातील दगड अकोले या ठिकाणी मुक्काम असतो. . श्री संत निळोबा महाराज पालखी : टेंभुर्णी व परिते या दोन ठिकाणी पालखी मुक्काम असतो. . श्री संत गहिनीनाथ महाराज पालखी : भोगेवाडी व अरण या ठिकाणी मुक्काम.
Source link
33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग