Headlines

‘सीए’च्या उपप्रादेशिक परिषदेमध्ये नितीन गडकरींचे व्हीसीद्वारे मार्गदर्शन:आयसीएआयच्या वतीने आयोजन; महाराष्ट्रातून लेखापाल उपस्थित‎




शहरातील आयसीएआय शाखेच्या वतीने शेगाव येथे सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटंट्स) यांची दोन दिवसीय ‘ज्ञान उदय’ उप-प्रादेशिक परिषद घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची परिषद वर्षातून केवळ एकदाच घेतली जाते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आसीएआय) वतीने आयोजित या परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सचे योगदान महत्त्वाचे आहे. सीए हे केवळ ऑडिट करणारे व्यावसायिक नसून, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार तसेच प्रभावी कर नियोजनाद्वारे राष्ट्रनिर्माणात भूमिका बजावणारे मुख्य घटक आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित खासदार अनुप धोत्रे यांनी देश व उद्योग क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीत सीएंच्या भूमिकेचे कौतुक केले. आयसीएआयचे उपाध्यक्ष मंगेश किनरे यांनी संस्थेच्या आगामी ध्येयांची, तर वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सौरभ अजमेरा यांनी सभासदांच्या कौशल्य विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक अकोला शाखेचे अध्यक्ष रोमिल सोजतिया यांनी केले. बदलते कर कायदे व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सीएंच्या ज्ञानाचे अद्ययावतीकरण किती गरजेचे आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत इन्कम टॅक्स ॲक्ट, सर्च-सीझर, एआयचा वापर, जीएसटी लिटिगेशन व भांडवली बाजार आदी विविध तांत्रिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोपप्रसंगी अकोला शाखेचे सचिव विशाल राजपाल यांनी आभार मानले. परिषदेच्या यशासाठी अकोला शाखेचे उपाध्यक्ष प्रतीक मंत्री, सचिव विशाल राजपाल, कोषाध्यक्ष श्याम माहेश्वरी तसेच विकासा अध्यक्ष धीरज चांडक यांनी परिश्रम घेतले. पहिल्या दिवसाच्या शेवटी आयोजित कवी संमेलनात मुन्ना बॅटरी, रोहित शर्मा आणि वरुण आनंद यांनी विनोदी कविता आणि हास्य-विनोद सादर केले. अनिल भंडारी यांनी “सीएंचे भविष्य, आव्हाने आणि पुढील रोडमॅप यावर मार्गदर्शन केले. ॲड. महेश अग्रवाल यांनी “सर्च, सीझर आणि री-असेसमेंट” यावरील कायदेशीर बाबी तर जिगर मेहता यांनी “इन्कम टॅक्स ॲक्ट २०२५: एक आढावा’वर मार्गदर्शन केले. अभिनव शर्मा यांनी “एआय (एआय) माझ्यासाठी, माझ्या कार्यालये व क्लायंटसाठी’ या विषयावर मार्गदर्शन केले. बिमल जैन व जतीन हरजाई यांनी जीएसटी लिटिगेशन, पेनल्टी आणि डिमांड्सचे विश्लेषण, आशिष बाहेती व चंदन तापडिया यांनी भांडवली बाजार आणि शेअर बाजारातील संधी यावर चर्चा केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *