![]()
तालुक्यातील गल्लेबोरगाव ते टाकळी आणि टाकळी ते बोरसर हा रस्ता या भागातील ४० गावांची मुख्य दळणवळण वाहिनी आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून, हा रस्ता प्रवाशांसाठी एक यातनाघर बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना दररोज छोटे-मोठे अपघ
.
या रस्त्यावर २०१३ मध्ये गल्लेबोरगाव फाटा ते अंतापूर २ किमी आणि २०१४-१५ मध्ये अंतापूर ते टाकळी बोरसर ९ किमी असे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अवघ्या एकाच वर्षात रस्ता पूर्णपणे उखडून गेला. गेल्या दहा वर्षांपासून बोरसर, टाकळी, वैसपूर, लव्हाळी, अंतापूर, केसापूर, जळगाव घाट, चापानेर, औराळा, पळसखेडा, जवळी, विटा, बाभूळखेडा, मनूर यांसह ४० गावांची जनता या जीवघेण्या खड्ड्यांतून प्रवास करत आहे. हा रस्ता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग, सिल्लोड-वैजापूर राज्य महामार्ग आणि देवगाव रंगारी-गंगापूर राज्य महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या स्वेच्छा निधीतून या रस्त्यासाठी २१ कोटी रुपये मंजूर आणले होते. परंतु, राज्यातील सत्ता बदलामुळे हा निधी परत गेला. त्यानंतर मतदारांनी शिवसेनेच्या आमदार संजना जाधव यांना विधानसभेत पाठवले. गेल्या दोन वर्षांपासून या भागातील जनता आमदार संजना जाधव आणि खासदार संदिपान भूमरे यांच्याकडे आशेने पाहत आहे, मात्र अद्याप पदरी निराशाच आली आहे. रस्त्याची चाळण झाल्यामुळे चिवळी, औराळा, चापानेर, जळगाव, टाकळी, गल्लेबोरगाव व बोरसर ते कन्नड या एसटी महामंडळाच्या दोन बसेस गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत. खाजगी वाहनेही या भागात येण्यास तयार होत नाहीत. शासनाने या रस्त्याची दुरवस्था तातडीने संपवली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, डॉ. दिलीपसिंग राजपूत, डॉ. तृप्ती राजपूत, विजय हार्दे, आकाश बोलधने, सुनील बोडखे, भरत बोडखे, विजय आहेर, स्वप्निल पवार, रवींद्र गायकवाड आदींनी दिला आहे. दहा वर्षांपासून बोरसर, टाकळी, वैसपूर, लव्हाळी, अंतापूर, केसापूर, जळगाव घाट, चापानेर, औराळा, पळसखेडासह ४० गावांची जनता खड्ड्यांतून प्रवास करत आहे.
रुग्णांसह विद्यार्थ्यांचे हाल;प्रशासनाचे दुर्लक्ष खराब रस्त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर दवाखान्यात पोहोचता न आल्याने गंभीर रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे, तर काही महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेणे सोडून दिले आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, हतनूर, गल्लेबोरगाव, खुलताबाद येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.