Headlines

जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक‎, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग




नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. पाटबंधारे विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जायकवाडी धरणातील जिवंत जलसाठा आता ६६१.८११ दलघमी म्हणजेच ३०.४९ टक्के इतका झाला आहे. धरणाची एकूण पाणीपातळी १५०६.०८ फूट (४५९.०५३ मीटर) वर पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी धरणातील जिवंत साठा ६५२.८१९ दलघमी (३०.०७ टक्के) एवढा नोंदवला गेला होता. मात्र, त्यानंतर वरच्या भागातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अवघ्या आठ तासांत २१ दलघमीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली. दरम्यान, पाटबंधारे विभागाने आतापासूनच पाण्याची आवक आणि करण्यात येणारा विसर्ग याचे नियोजन करावे, अशी मागणी किशोर तावरे यांनी केली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. २२,०४९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू सध्या धरणात २२,०४९ क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. तसेच नागमठाण बंधाऱ्यावरून ३०,२०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीकडे येणारा प्रवाह तीव्र आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात तसेच स्थानिक भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आगामी काही तासांत होणारी पाण्याची आवक मंदावण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ६३ % तर यंदा केवळ ३० % साठा मागील वर्षाचा विचार केला असता, आजच्याच दिवशी जायकवाडी धरणात ६३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता आणि आवक वेगाने वाढल्यामुळे २८ जुलै रोजीच गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची वेळ आली होती. मात्र, यंदा मान्सून लांबल्याने आणि धरणातील आवक उशिरा सुरू झाल्यामुळे मराठवाड्यावरील जलसंकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. यंदा ३० टक्के साठा असल्याचे मंगेश शेलार यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *