Headlines

घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणाच नाही:मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे नियोजनाचा अभाव, पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत करा- ॲड. प्रकाश आंबेडकर




पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. “घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. मोशी कचरा डेपोची दुर्घटना म्हणजे पूर्णपणे नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षाचा थेट परिणाम आहे,” अशा शब्दांत त्यांनी पालिका प्रशासन आणि शासकीय यंत्रणेवर गंभीर ताशेरे ओढले. तसेच, मृत व बाधित कामगारांच्या पीडित कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी सरकार व पालिकेकडे केली. शुक्रवारी सकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोशी येथील दुर्घटनाग्रस्त कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सुरू असलेल्या मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा अवाढव्य ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि कामगारांना आंबेडकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, त्यांच्या पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भरीव आर्थिक मदत करा ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे 1400 ते 1500 टन कचरा गोळा होतो. घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा आणि नागरिकांच्या आरोग्याशी निगडित विषय असूनही तो प्रशासकीय पातळीवर पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सतत घातक वायू उत्सर्जित होत असतात. या घातक वायूंचे योग्य आणि सुरक्षित व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, दुर्दैवाने यासाठी शासकीय पातळीवर आजच्या घडीला कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. ही भीषण दुर्घटना म्हणजे याच नियोजनाच्या अभावाचा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा ढळढळीत पुरावा आहे. परी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारने या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या बाधित कामगारांच्या कुटुंबांना कोणतीही दिरंगाई न करता भरीव आर्थिक मदत सुपूर्द करावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *