Headlines

स्थायीच्या सभेत सभापती अग्रवाल नगरसेवक भारुका यांच्यात जुंपली:सभापती आक्रमक, सेनेचे नगरसेवक 15 दिवस निलंबित‎



मनपा स्थायी समितीची सोमवारी सायंकाळी झालेली सभा गदारोळ, आरोप- प्रत्यारोप आणि शिवीगाळीमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरुवातीलाच स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद न

.

शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक असलेले सागर भारुका हे भाजपच्या मित्रपक्षाचे नगरसेवक असूनही, त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, सभापती अग्रवाल यांच्या आदेशानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उर्वरित पान ४ वाद वाढत गेल्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही वेळातच वातावरण तापले आणि दोघांनी एकमेकांवर शिवीगाळ केल्याचेही पाहायला मिळाले. परिस्थिती इतकी बिघडली की विजय अग्रवाल आणि सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले. महापौर शारदा खेडकर आणि सत्ताधारी शहर सुधार आघाडीच्या महिला नगरसेवकांसमोर हा प्रकार घडल्याने सभागृहात उपस्थित महिला नगरसेविकांची मान लाजेने खाली गेली. भाजपचे नगरसेवक विनोद मापारी, काँग्रेसचे आझाद खान व इतर काही सदस्यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.नगरसेवक मोहम्मद फजलू, हरीश अलीमचंदानी, आझाद खान, विनोद मापारी आणि इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

महापौर, महिला नगरसेवकांसमोरच जोरदार राडा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *