Headlines

पुणे तरुणांचे, तर सिंधुदुर्ग वृद्धांचे शहर ठरू लागले:स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला; शिक्षण-रोजगारासाठी तरुणांची धाव



महाराष्ट्राची लोकसंख्या १२.९३ कोटींवर पोहोचली असताना गेल्या १५ वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणाईचा टक्का थेट ३४ वर गेला आहे. मात्र, रोजगार आणि शिक्षणामुळे झालेल्या महानगरीय स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला आहे. ६१% तरुण लोकसंख्येसह पुणे राज्याचे ‘य

.

सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासाठी हा सध्या “गोल्डन पिरीयड’ असला तरी पुढील १५ वर्षांत (२०४० पर्यंत) हाच ३४% तरुण वर्ग वृद्धत्वाकडे झुकेल. आज जी शहरे तरुण आहेत ती भविष्यात वृद्धांची शहरे बनतील. त्यामुळे युरोपीय देशांप्रमाणे महाराष्ट्रालाही आतापासूनच वृद्धांच्या पेन्शन, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस धोरण आखावे लागेल, अन्यथा भविष्यातील “एजिंग ट्रॅप’ राज्यासाठी सामाजिक संकट ठरेल.

शेतीचा खोळंबा अन् कौटुंबिक एकाकीपणा

तरुणांच्या स्थलांतरामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील शेती व्यवस्था कोलमडली आहे. शेतीसाठी तरुण मनुष्यबळ उरलेले नाही, ज्यामुळे लाखो एकर सुपीक जमीन पडीक राहू लागली आहे. वृद्ध आई-वडील शहरात रुळू शकत नाहीत.

रोजगार हेच मुख्य कारण

पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तरुणाई वाढण्याचे मुख्य कारण रोजगार हेच आहे. तंत्रज्ञान व विज्ञान आधारित शिक्षण व संधी छोट्या शहरांपेक्षा मोठ्या शहरातच असल्याने तेथे स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक आहे. पुण्यामध्ये तर आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, एमआयडीसी असल्याने संपूर्ण राज्यातून होणारे तरुणांचे येथे स्थलांतर होते. विशेष म्हणजे मोठ्या शहरांचे आकर्षणही तरुणाईत आहे. -डॉ. अनिल जायभाये, विभागप्रमुख, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वा.रा.ती.म. उपपरिसर, लातूर.

शहर प्रमाण १०० तरुणांमागे वृद्धांची संख्या सिंधुदुर्ग ३०% ८० रत्नागिरी ३४% ६१ सातारा ३८% ४५ सांगली ४१% ३८ कोल्हापूर ग्रा. ४३% ३५

शहर प्रमाण १०० तरुणांमागे वृद्धांची संख्या पुणे ६१% १५ ठाणे ५८% १७ मुंबई उपनगर ५७% १८ नाशिक ५१% २४ संभाजीनगर ४९% २६ स्रोत: केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय (MoSPI २०२६ अंदाज) आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5).



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *