Headlines

"समृद्धी’वर भरधाव ट्रकने जीवरक्षकालाच चिरडले:अपघात करून पळालेला ट्रक 12 तासांत जप्त




समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात घडला. महामार्गावर नादुरुस्त झालेल्या एका कारमधील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी बॅरिकेडिंग करणाऱ्या महामार्ग आपत्कालीन मदत वाहनाचे (आरपीओ) चालक मुन्नालाल प्रजापती (३४) यांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची चाके प्रजापती यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने पायांच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या, तर डोके रस्त्यावर आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई कॉरिडॉरवरील वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चॅनल नंबर ५४१ जवळ एक कार (एमएच ०४ एचएक्स २९५३) ब्रेकडाऊन झाली होती. छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षातून रात्री १२.३४ वाजता माहिती मिळताच कर्तव्यतत्पर प्रजापती स्वतःच्या आरपीओ वाहनासह (एमएच १५ जेसी ३८१५) घटनास्थळी धावले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ते कारच्या मागे बॅरिकेडिंग करत असतानाच भरधाव ट्रकने प्रजापतींसह दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रकचालक अंधाराचा फायदा घेऊन मुंबईच्या दिशेने पसार झाला. सहकाऱ्यांना प्रजापती यांच्या पायांचा लगदा गोळा करताना अश्रू अनावर झाले होते. मूळचे प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील असलेले प्रजापती गेली ४ वर्षे गोंदे येथे प्रामाणिकपणे सेवा देत होते. चाकांना लागलेल्या रक्ताने गुन्हा उघड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुंबईपर्यंतच्या सर्व इंटरचेंजना अलर्ट केले होते. मात्र, चालक गौरव वाल्मीक जायभाये (रा. छत्रपती संभाजीनगर) याने ट्रक (एमएच ०७ बिडी ७६७७) समृद्धीवरून पुढे न नेता गोंदे येथे नाशिक-पुणे महामार्गावर खाली उतरवला आणि सिन्नरजवळील गुरेवाडी शिवारात एका ढाब्यावर रात्रभर लपवून ठेवला. ​शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास तो काही न झाल्याच्या आविर्भावात पुन्हा गोंदे टोलनाक्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी समृद्धीवर चढला. ट्रकच्या चाकांची पाहणी केली असता चाकांना रक्ताचे डाग आढळले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *