Headlines

110 जणांना लाभ:खंडाळ्यात पशुपालकांना संकरित मका बियाणे वाटप, वैरण विकास योजनेचा लाभ‎




शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि चारा पिकांची उपलब्धता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदा हवामान विभागाने एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरी पर्जन्यमान ९० ते ९२ टक्के होण्याचा अंदाज वर्तवला असून, चारा टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील खंडाळा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या १४ गावांतील ११० निवडक लाभार्थ्यांना ४ क्विंटल ४० किलो संकरित मका बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास मोती यांच्या हस्ते सोमवार रोजी या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हुसेन शेख, विजय मगर, कैलास सोनवणे, पांडुरंग पवार, सावळीराम मोरे, हाजी मोहम्मद शेख, जमिन शेख, कडू पवार, बाळासाहेब जानराव, कैलास पैठणकर, सोपान पवार, संतोष सोनवणे, मधुकर पवार, बबन पवार, सचिन देसाई, दीपक बागुल, सचिन जाधव, मच्छिंद्र वेळंजकर, नाविद शेख आणि सोमनाथ गवारे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी लाभार्थी शेतकरी सोमनाथ गवारे म्हणाले, “माझ्याकडे तीन गाई असून रोज १५ ते २० लिटर दूध मिळते. आम्हाला नेहमी चारा टंचाईची चणचण भासत असे. या योजनेची माहिती मिळताच मी अर्ज केला आणि मला पहिल्यांदाच लाभ मिळाला. या मोफत बियाण्यांमुळे चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे.” या योजनेमुळे खंडाळा परिसरातील पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून चारा टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *