![]()
जिल्हा आयुष रुग्णालयाच्या आवारात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिम आणि दिव्य मराठीच्या “एक वृक्ष एक जीवन’ मोहिमेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत रुग्णालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या औषधी आणि उपयुक्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य सविता मोरे, नगरसेवक दत्ता गाडळकर, वृक्षमित्र अजित कटारिया, हर्षल आगळे, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रताप काळे, संजय जोशी, डॉ. सुवर्णमाला बांगर आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते बकुळ, आपटा, चिंच आणि लिंब यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाचे महत्त्व विशद केले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांना दैनंदिन जीवनात वृक्षांचे असणारे स्थान आणि पर्यावरण समतोलासाठी वृक्षजोपासना किती आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. या उपक्रमासाठी महानगरपालिकेकडून खड्डे खोदण्यासाठी जेसीबीची मदत पुरवण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. नाझिया शेख, डॉ. हरलीन कौर पुरी, संगीता नन्नवरे तसेच रुग्णालयाचे असिस्टंट मेट्रन अजिंक्य पवार, वर्षा जाधव, विशाल केदारी, अश्विनी बोरगे, योगिता कदम, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, पवन शिसोदे, हर्षा फाळके, चैतन्य निकम आदींनी योगदान दिले.
Source link
आयुष रुग्णालयामध्ये विविध औषधी वनस्पतींची लागवड:दिव्य मराठी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे ग्रीन सिटी मोहिमेचा उपक्रम