Headlines

दूध भेसळ प्रकरणावरून जयंत पाटील-सुरेश धस आमनेसामने:जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, उलटा फिरलो तर सोडणार नाही- धस




जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही.मी सहज डिवचायचा माणूस नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे नाही. तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना दिला आहे. आमदार सुरेश धस म्हणाले की, देवाने तुम्हाला जेवढे डोकं दिले आहे, त्यापेक्षा एक टक्का जास्त आम्हाला दिले आहे. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचत असाल, तर आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘जिओ टॅगिंग’च्या जीआरचा मुद्दा उपस्थित करत, त्या निर्णयाच्या आड महाराष्ट्रात मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. ‘महालक्ष्मी’ नावाची संस्था नेमकी कोणाची आहे, तिची नोंदणी कोणाच्या नावावर आहे आणि त्या संस्थेत कोणाचा किती आर्थिक वाटा आहे, याचा सर्व कच्चाचिठ्ठा आपण बाहेर काढणार असल्याचे धस म्हणाले. जयंत पाटलांचे सभागृहात गंभीर आरोप विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील दूध संकलन प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर बोट ठेवले. ते म्हणाले, बीडमधील एका आमदाराची पत्नी डेअरी चालक आणि दूध संकलन संस्थांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनाही निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जात आहे. एवढेच नव्हे तर, संबंधित महिला या प्रकरणी बातम्या छापणाऱ्या संपादकांनाही फोन करून धमकावत असल्याचा दावा पाटलांनी केला. ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ती महिला कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे सभागृहात स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या संपूर्ण भाषणात पाटलांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *