Headlines

व्यावसायिकाची एक कोटी 21 लाखांची ऑनलाईन फसवणूक:शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडा घातला




पुण्यात एका व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी समाज माध्यमांद्वारे संपर्क साधून ही फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ५८ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक मुंढव्यातील केशवनगर भागात राहतात. गेल्या वर्षी सायबर चोरट्यांनी त्यांच्या समाज माध्यमातील खात्यावर संदेश पाठवून संपर्क साधला होता. चोरट्यांनी व्यावसायिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना एका समाज माध्यमातील गुंतवणूक समुहात सहभागी करून घेतले. या समूहात शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजना आणि त्यावरील परताव्याची माहिती दिली जात होती. गुंतवणुकीसाठी चोरट्यांनी व्यावसायिकाला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, व्यावसायिकाने वेळोवेळी एकूण एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. काही काळानंतर चोरट्यांनी व्यावसायिकाला परतावा मिळाल्याचा संदेश पाठवला, परंतु त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. व्यावसायिकांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दंडात्मक कारवाईचे चलन पाठवून फसवणूक प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई (ई-चलन) करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची चार लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसरमधील फुरसुंगी परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्याचा मोबाइलम क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला होता. चोरट्यांनी मोबाइल क्रमांक हॅक करुन तरुणाच्या खात्यातून रोकड लांबविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *