Headlines

'माऊली माऊली'चा अखंड जयघोष:नीरा नदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे पवित्र स्नान; पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन पालखी साताऱ्याकडे रवाना




संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत भावपूर्ण आणि परंपरेने महत्त्वाचा मानला जाणारा नीरा स्नान सोहळा बुधवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. माऊली माऊली’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हजारो वारकरी-भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात विधिवत स्नान घालण्यात आले. या सोहळ्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाकडे प्रस्थान केले. माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन नीरा नदीतील पारंपरिक स्नानानंतर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पुष्पहार अर्पण करून माऊलींचे दर्शन घेत स्वागत केले. पोलीस बँडच्या सुरेल वादनाने स्वागत सोहळ्याची शोभा अधिक खुलली. पालखी मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांनी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि हरिनामाच्या गजरातून माऊलींचे स्वागत केले. अनेक सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संघटनांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फराळ, वैद्यकीय मदत आणि अन्य सेवा उपलब्ध करून दिल्या. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता पथके आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ‘माऊली माऊली’च्या अखंड जयघोषात सोहळ्याचे राजाभाऊ पवार-आरफळकर, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, सोहळा प्रमुख भावार्थ देखणे आणि अन्य मानकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर आणण्यात आले. त्यानंतर ‘माऊली माऊली’च्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. स्नानानंतर स्थानिक महिलांनी मंदिरासमोर फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. हा पवित्र सोहळा पाहण्यासाठी दत्त घाट तसेच नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पालखीचा अर्धा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आणि पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. या सोहळ्यानंतर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. राजकीय उपस्थितीचीही चर्चा
माऊलींच्या स्वागतासाठी राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने या स्वागत सोहळ्याला राजकीय रंगही लाभला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधत उपस्थिती लावल्याची चर्चा पालखी मार्गावर रंगली. मात्र, राजकीय चर्चांपेक्षा “माऊली”च्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी हा दिवस भक्ती, समता आणि वारकरी परंपरेच्या संस्कारांचा उत्सव ठरला. हेही वाचा.. शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार!:48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; कर्जमाफीनिमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, लवकरच राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *