![]()
नवोदित निर्माते,कलावंतांनी चित्रपट उद्योग हा सजगपणे समजून घेणे महत्वाचे असून, याचे रितसर प्रशिक्षण घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे,असे मत चित्रपट निर्माते पंकज धंदर यांनी कार्यशाळेत व्यक्त केले. स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित बिईंग आर्टि
.
मर्यादित निवडक प्रशिक्षणार्थीना प्रवेश असणाऱ्या या महत्वपूर्ण कार्यशाळेला अमरावती ,यवतमाळ ,परतवाडा ,तिवसा , चांदूर बाजार, शिराळा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर , नागपूर अशा विविध शहरांतून आलेले प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही मालिका , सोशल मीडिया कंटेंट, इतर माध्यमांची ओळख, कार्यप्रणाली, वेगवेगळे विभाग, त्यातील विविध व्यवसाय व रोजगार संधीची उपलब्धता, माध्यमांचे रीतसर शिक्षणाचे महत्व व आवश्यकता, आर्थिक सहाय्य , विविध खासगी, शासकिय विभागांमध्ये नोकरीची पदे व त्यांची प्रक्रिया या बद्दल मुद्देसूद रितसर मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना देण्यात आले.त्याचप्रमाणे बिईंग आर्टिस्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिप्लोमा फिल्म्स चे विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्यात चैतन्य सराफ लिखित -दिग्दर्शित “नाते मैत्रीचे” तसेच प्रशिक्षक पंकज धंदर लिखित -दिग्दर्शित “दुसरी बाजू’ या शॉर्ट फिल्म्स प्रशिक्षणार्थीना दाखवण्यात आल्या तसेच त्यांचे विषय -आशय , निर्मिती प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली.
ओळख परिचय-चर्चा-मार्गदर् शन-फिल्मस्क्रिनिंग तसेच अनुभवांची देवाण घेवाण अशा स्वरूपातील या कार्यशाळांची गरज तसेच चित्रपट निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेणे खरच किती महत्वाचे आहे आणि विशेषतः नवोदित निर्माते ज्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यायचे आहे त्यांच्या साठी ही कार्यशाळा अतिशय महत्वाची असल्याची जाणीव झाल्याचे प्रशिक्षणार्थीनी आपल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त केले. आधी सर्व नीट शिकून घ्यायचं, समजून घ्यायचं,सरावाने पक्कं व्हायचं, मग पुढे जायचं हे साध सरळ सूत्र त्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यशाळेच्या आयोजनाची महत्वपूर्ण जबाबदारी बिईंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड थिएटर आर्ट्सच्या संचालिका स्नेहा वासनिक व प्रशिक्षक म्हणून फ़िल्म मेकर पंकज धंदर यांनी केली. विज्ञप्ती पर्वतकर, प्रवीण वानखडे, राज इसळ, श्रुती दंदे व साक्षी जिभकाटे यांचे आयोजन सहाय्य लाभले. कार्यशाळेत मनोजकुमार कटकतलवारे, सृष्टी काळे , चेतन खेडकर, रत्नदीप रुपवणे, आशिष वाघमारे , अभिषेक ढोके, आकाश पांडे, प्रफुल्ल सावलकर, प्रशिक पांडे , योगेश म्हाला या प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.