Headlines

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीपूर येथील अतिक्रमणे हटवली:नगरसेविका तेजश्री लाटे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश‎



.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीपूर येथे पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. येथील नगरसेविका तेजश्री विक्रमसिंह लाटे यांनी पालकमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. श्रीपूरमधील निरा कालव्यालगत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील या मार्गावर चहाच्या टपऱ्या, भाजी व फळविक्रेते, पानटपऱ्या आणि अन्य तात्पुरती दुकाने उभारण्यात आली होती, ती हटवण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष सावंत यांना पालखीपूर्वी अतिक्रमण हटविण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक, पोलिस फौजफाट्यासह, महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करण्यात आली आहे. ^कोणत्याही व्यावसायिकावर अन्याय करण्याचा आमचा हेतू नाही. फलटणच्या पार्श्वभूमीवर निरा कालव्यावर गाळे बांधून या व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे गटनेते राहूल रेडे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वृध्द, शाळकरी मुली व दोन कारखान्याची रहदारी यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेजश्री लाटे, नगरसेविका (महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *