![]()
देशात कमकुवत झालेल्या मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील सात दिवसांत पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, पूर्व यूपी तसेच पश्चिम हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ओडिशामध्ये १६ जुलै रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. ‘ऑल इंडिया वेदर’च्या माहितीनुसार, या कमी दाबाच्या प्रणालीसोबतच विषुववृत्ताजवळ आणखी एक मोठी हवमान प्रणाली सक्रिय होत आहे. या दोन्हीच्या संयुक्त प्रभावामुळे २० ते ३० जुलै दरम्यान उत्तर, पूर्व व मध्य भारतात पावसाची दाट शक्यता आहे. तामिळनाडूत आजपर्यंत
असामान्य उष्णतेची लाट चेन्नई | तामिळनाडूमध्ये १७ जुलैपर्यंत असामान्य उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहू शकते. एल निनोशी संबंधित वातावरणीय प्रभावामुळे ढग कमी तयार होत आहेत, ज्यामुळे जुलैतही तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिले आहे. जम्मू-काश्मीर: १५ दिवसांत १६ ढगफुटी, अलर्ट जारी श्रीनगर | जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या आगमनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये १५ दिवसांच्या आत १५ ते १६ वेळा ढगफुटी झाली.काश्मीर हवामान केंद्रानुसार, आगामी काळात अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते. २२५ वर्षांत यमुना ६८% आक्रसली, नैसर्गिक प्रवाह ८९% घटला नवी दिल्ली| दिल्लीतील यमुना नदी २५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर आक्रसली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या भूविज्ञान विभाग व भारतीय विज्ञान शिक्षण संस्था, भोपाळच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली. १७९९ च्या तुलनेत नदीचे पात्र ६८ % व तिचा नैसर्गिक प्रवाह ८९%घटला. संशोधकांनी १७९९ मध्ये अपजॉन यांनी तयार केलेला ऐतिहासिक नकाशा व आधुनिक उपग्रह छायाचित्रांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला की मानवी हस्तक्षेप, धरणांचे निर्माण आणि वेगवान शहरीकरणामुळे यमुनेच्या नैसर्गिक स्वरूपात मोठा बदल झाला आहे. देशातील ५० ते ६०%भागात पुन्हा ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस व वादळाची माहिती समोर आली आहे. स्कायमेटनुसार, १९ जुलैपासून उत्तर-पश्चिम भारतात एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम हिमालयीन राज्ये व उत्तर भारतात आधीच सक्रिय असलेल्या मान्सून प्रणालीला अतिरिक्त आर्द्रता आणि बळ मिळेल. परिणामी पुढील आठवड्यात अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. स्कायमेटच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि गुजरात-राजस्थानवरही वेगवेगळ्या मौसमी प्रणाली सक्रिय आहेत.
Source link
नव्या 2 सिस्टिम्सने मान्सून वेग पकडणार:20 जुलैपासून उत्तर, मध्य भारतात पाऊस, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आशादायक चित्र