Headlines

साताऱ्याच्या माजी सरपंचांसह 3 भावांवर जादूटोण्याचा प्रयत्न:भावकीतीलच व्यक्तीकडून अघोरी प्रकार; आरोपी अटकेत




राजकीय, व्यावसायिक वर्चस्व असलेल्या पटेल बंधूंचा काटा काढण्यासाठी त्यांच्या भावकीतीलच एकाने जादूटोणा करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. एका मांत्रिकाला सोबत घेऊन मोकळ्या जागेत अघोरी साहित्य जाळून मंत्रोच्चार करत या चौघांचे फोटो खिळ्याने झाडाला ठोकले. जानेवारी ते ५ जुलै यादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यात मुख्य आरोपी आयुबखान जब्बारखान पठाण (रा. सिल्कमिल कॉलनी) यास सातारा पोलिसांनी अटक केली असून, ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. सातारा गावचे माजी सरपंच फेरोज पटेल आणि बांधकाम व्यावसायिक अश्फाक पटेल यांच्यासोबत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अय्युब खान एका मांत्रिकाला घेऊन वाळूज भागात गेला. त्याने पुणे रोडवर निर्जन ठिकाणी झाडाखाली अघोरी साहित्य जाळून मंत्रोच्चार केले. त्यानंतर अश्फाक, फेरोज, अमजद आणि खालेद यांचे फोटो खिळ्याने त्या झाडाला ठोकण्यात आले. अश्फाक पटेल यांच्या ज्योती बिल्डर्सच्या कार्यालयात गांजा ठेवून त्यांना अडकवण्याचीही त्याची योजना होती. हे काम करण्यासाठी त्याने चालक इर्शादकडे हट्ट धरला होता. एका महिलेचा खून करून त्याचा आरोप या चारही पटेल बंधूंवर टाकून त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचा कटही अय्युब खानने रचला होता आणि त्यासाठी त्याने एक महिलाही शोधली होती. चालकाने उघड केला कट संपूर्ण कटाचा पर्दाफाश अय्युब खानचा अंगरक्षक व चालक मोहम्मद इर्शाद मोहम्मद उमर (रा. सादातनगर) याने केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये अय्युब खानने मोहम्मद इर्शादला दररोज २ हजार रुपये पगारावर कामाला ठेवले होते. बॉडीगार्ड आणि चालक म्हणून तो काम करायचा. आपल्या मालकाचा हा भयंकर प्रकार ऐकून घाबरलेल्या मोहम्मद इर्शादने त्याचे काम सोडले. त्यानंतर अय्युब खानने त्याला जिवे मारण्याची खोटी तक्रार देण्याची आणि जादूटोणा करण्याची धमकी दिली. मात्र, चालकानेच या प्रकाराचे बिंग फोडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *