Headlines

20 लाख रुपयांसाठी छळ:5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, नोकरी लावण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी‎




पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याची मागणी करत २६ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रियंका उर्फ लता नितेश सागरे (रा. रजाळवाडी) यांचा विवाह २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नितेश सागरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याचा तगादा सासरच्यांनी लावला. तक्रारदाराच्या आई-वडिलांनी खाजगी सावकाराकडून कर्ज व उसनवारी करून वेळोवेळी सासरच्या मंडळींना १५ लाख रुपये दिले. तरीही ५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा छळ सुरूच ठेवण्यात आला. १५ जुलै रोजी प्रियंका यांना बेदम मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून पती नितेश सागरे, सासू विमल सागरे, सासरे विलास सागरे, दीर सचिन सागरे आणि दादाराव राठोड (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास काकासाहेब सोनवणे करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *