Headlines

कार व ॲपे रिक्षाचा भीषण अपघात:महिला जागीच ठार , तिघे गंभीर जखमी




तालुक्यातील डिग्रस फाटा येथे सायंकाळी चारचाकी कार व ॲपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेत तीनजण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले असून एक ५५ वर्षीय महिला जागीच ठार झाली. चांगुनाबाई पवार व त्यांचे पती शुक्रवारी सायंकाळी ॲपे रिक्षामध्ये बसून राहुरीकडून डिग्रस येथे जात होते. रिक्षा नगर मनमाड महामार्गावरवरुन डिग्रस फाट्याकडे वळत असताना एक चारचाकी कार नगरकडून राहुरीकडे येत होती. त्यावेळी चारचाकी कार आणि ॲपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. यावेळी रिक्षा दोन ते तीन पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला पडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. या भीषण अपघातात रिक्षामधील चांगुनाबाई भिमा पवार या जागीच ठार झाल्या तर रिक्षा चालक सिताराम ऊर्फ ताया सिताराम शिंदे (रा. गोटूंबे आखाडा) भिमा बाबूराव पवार (रा. डिग्रस) तसेच चारचाकी कारमध्ये असलेले दीपक संभाजी हारे, रोहिणी दिपक हारे या पती पत्नीसह त्यांचा मुलगा हे गंभीर जखमी झाले. चांगुनाबाई पवार यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. सुधीर क्षीरसागर यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *