Headlines

अपघात मुक्तवारी:माऊलींच्या पालखीसाठी नातेपुतेमध्ये 1400 पोलिसांचा बंदोबस्त




माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते या ठिकाणी असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल वायकर यांनी धर्मपुरी स्वागत, कारुंडे विसावा, मोरोची, जिजाऊ चौक, महामार्गावरील वाहतूक यांची पाहणी करून बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे. पालखी सोहळ्यासाठी १४०० कर्मचारी बंदोबस्तात असून २०० होमगार्ड, १०५० पोलीस, १५० अधिकारी तैनात केले आहेत. तसेच वॉटर फिलिंग पॉईंट, सोहळा मार्ग, पालखी क्रॉसिंग पॉईंट या ठिकाणीही बंदोबस्तात वाढ केली असून वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, तसेच अपघातमुक्त वारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाहणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आदी उपस्थित होते. पालखी नातेपुते मुक्कामी आल्यानंतर या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. पालखी तळावर कडेकोट बंदोबस्त आहे. भक्तांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *