Headlines

Supriya Sule Health Update; Doctor Advises Voice Rest


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या स्पष्ट आणि आक्रमक वक्तृत्वाने नेहमीच राजकीय मैदान गाजवणाऱ्या सुप्रिया सुळे यांना आगामी काही दिवस शांत राहावे लागणार आहे. घशामध्ये स

.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले की, “आज मी घसा आणि आवाजाच्या त्रासामुळे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. त्यांनी तपासणीअंती माझ्या घशात थोडी सूज असल्याचे सांगितले आहे. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी मला आवाजाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा कडक सल्ला दिला आहे.”

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांची ‘व्हॉईस थेरपी’ सुरू होणार आहे. यामुळे पुढील एक ते दोन आठवडे त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलणे, राजकीय भाषणे देणे, प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे किंवा दीर्घकाळ संवाद साधणे पूर्णपणे टाळणार आहेत.

नुकताच दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी उठवला होता आवाज

घशाचा त्रास सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत सक्रिय होत्या. त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जाऊन नीट पेपरफुटी प्रकरणी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “सोनमजींची प्रकृती चिंताजनक असून देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी मी त्यांना विनंती केली. हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून देशातील लाखो तरुणांच्या भविष्याशी आणि ‘NEET’ परीक्षेच्या विश्वासार्हतेशी जोडलेला अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र, केंद्र सरकार अद्यापही यावर मौन बाळगून आहे. लोकशाहीत सरकारने संवेदनशीलतेने उत्तर देणे गरजेचे आहे, शांत बसून नाही. मी या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभी असून, संसदेत आणि इतर सर्व व्यासपीठांवर देशातील तरुणांचा आवाज बुलंद करत राहीन,” असे सुळे यांनी आपल्या आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा…

भाजपने म्हटले- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करा:त्यानंतर NDA मध्ये सामील व्हा; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदांचीही ऑफर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार यावेळी संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. म्हणूनच एनडीएच्या पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येऊन एनडीएचा सहयोगी पक्ष बनावे, असा सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा…

आमच्याकडून विलीनीकरणाच्या विषयावर पूर्णविराम:अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीत या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत भावनिक आणि तितकीच ठाम प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती, त्या गोष्टीला आम्ही आता आमच्या मनात आणि संघटनेत पूर्णविराम दिला आहे. अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.