![]()
लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातची बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी (दि. 13) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’च्या कार्यालयात तब्बल 17 तास कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईसाठी मुंबईहून रविवारी रात्री 11:30 वाजता केंद्रीय यंत्रणांचे पथक रवाना झाले होते. अत्यंत गुप्तता पाळत हे पथक पहाटे 3 वाजेच्या सुमारात कर्मयोगीनगर परिसरात पोहोचले. परिसराची रेकी केल्यानंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ तपासणीत खरातच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक व्यवहारांची माहिती पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. केवळ नाशिकच नव्हे, तर खरातचे आर्थिक हितसंबंध असलेल्या शिर्डी, सिन्नर, मीरगाव आणि कोपरगाव यांसारख्या शहरांतही पथकाने धाडी टाकल्या. खरातने ‘अध्यात्मिक’ बुरख्याखाली जमवलेली मालमत्ता नेमकी कुठून आली? यामध्ये काही बड्या धेंडांचा सहभाग आहे का? आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा स्रोत काय? या दिशेने आता ईडीने तपास सुरू केला आहे. विशेषतः तृप्ताबाला बंगल्यासह मिरगाव येथील फार्महाऊस येथून अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मयोगीनगरमध्ये दहशतीचे सावट; वॉचमनही झाला गायब खरातचे काळे कारनामे उघड झाल्यापासून कर्मयोगीनगर परिसर सातत्याने चर्चेत आहे. आधी पोलिस, मग एसआयटी आणि आता थेट ईडी-आयकर विभागाच्या गाड्यांचा ताफा पाहून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या कारवाईच्या धसक्याने खरातच्या बंगल्याबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा त्याचा वॉचमनदेखील घर सोडून पसार झाला आहे. पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या चौकशीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. ‘समता’मधील 8 कर्मचाऱ्यांची चौकशी भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे धक्कादायक पैलू समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. समता पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांप्रकरणी सोमवारी प्रतिभा चाकणकर व त्यांचा मुलगा तन्मय यांची शिर्डी पोलिसांनी सकाळी 10 वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत चौकशी केली. तर दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राहाता येथील समता पतसंस्थेत धडक देत दिवसभर कागदपत्रांची छाननी केली. या कारवाईत 8 अधिकारी सहभागी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, “प्रतिभा चाकणकर यांनी या खात्यांबाबत मला कोणतीही माहिती नाही, तसेच खात्यांवरील व्यवहारांशी माझा किंवा माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या व त्यांच्या मुलाच्या नावावर समता पतसंस्थेत चार खाती असून, या खात्यांवरून सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना सखोल चौकशीसाठी पाचारण केले होते. खाते असल्याची माहिती माध्यमांतूनच समजल्याचे चाकणकरांनी सांगितले. अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही, पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय नंतर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिरगावातील ‘ब्रह्मा सदन’वर धाड आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) संयुक्त पथकांनी सोमवारी सकाळी 7 वाजेपासून खरातच्या मिरगाव येथील ‘ब्रह्मा सदन’ या आलिशान फार्म हाऊसवर छापा टाकल़ा. प्रचंड गोपनीयता पाळत ही कारवाई करण्यात आली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाहनांमधून तपास पथकातील अधिकारी मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरात दाखल झाले. खरातच्या ‘ब्रह्मा सदन’ फार्महाऊसमध्ये शिरताच अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराचे दरवाजे बंद करून घेतले. या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन फसवणुकीनंतर आता खरातचे आर्थिक कारनामे रडारवर असून, दिवसभर पथकाने फायलींचा कसून शोध घेतला. खरातचे कारनामे ईडीच्या कक्षेत काळ्या धंद्यातून कोट्यवधींचा गंडा घालून खरात याने अफाट माया जमवली आहे. मिरगावसह परिसरात जमीन खरेदीचा त्याने सपाटा लावला होता. खरातशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांमधील आर्थिक धागेदोरे तपासले जात आहेत. त्यात राहता आणि सिन्नरमधील पतसंस्थांचा देखील समावेश आहे. दमानिया म्हणाल्या… अंजली दमानिया : वर्षभरात विशेष पोलिस महानिरिक्षक कराळेंचे खरातला 18 फोन, चौकशी करा मुंबई | नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रेय कराळे यांनी खरातला वर्षभरात 18 फोन केल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस महानिरिक्षक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. तसेच खरातच्या संपर्कात असलेल्या 1825 सरकारी अधिकाऱ्यांचे क्रमांक एसआयटीला दिले असून, बुधवारी याप्रकरणी मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांमधून जाहीर केले. खरातच्या संपर्कात असणाऱ्या या 1825 फोन नंबंर्समध्ये आयजी, पीआय, सिनिअर पीआय, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, याबाबत कराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मुद्यावर आपण आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, किंवा वक्तव्य करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कर्मवीरनगरातील बंगल्यावर सकाळी 8 वाजता पोहोचली ईडी समता पतसंस्थेत सुरू असलेल्या चौकशीत ईडीचे 8 अधिकारी सहभागी झाले होते. सकाळी पतसंस्थेत त्यांनी बनावट खात्यांसंदर्भात कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. दुपारी जेदोन अधिकाऱ्यांनी राहत्यातील हॉटेलमधून जाऊन सर्वांसाठी जेवण आणले. तोपर्यंत आतून बाहेर जाण्याची कुणालाही परवानगी नव्हती. ही कारवाई इतकी गोपनीय होती की फार्महाऊसच्या आत नेमके काय सुरू आहे, याची कल्पना ग्रामस्थांनाही येत नव्हती. रात्री उशिरापर्यंत तपास पथके तिथे ठाण मांडून होती. या कारवाईतून खरातचे कोणते नवीन कारनामे आणि आर्थिक घोटाळे बाहेर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चाकणकर यांच्या वकील ॲड. जयश्री काळे यांनी विविध मुद्दे मांडले. प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांच्या नावाने बनावट खाती उघडली गेली. चुकीचा पत्ता वापरण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सह्यांचे नमुने सादर करण्यात आले. पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ब्रह्मा सदन’मधील आलिशान दालनांमध्ये असलेल्या कपाटांच्या चाव्या उपलब्ध नसल्याने, पथकाने सोबत आणलेल्या तज्ज्ञ कारागिरांच्या मदतीने बनावट चाव्या तयार केल्या. या कपाटांमधून खरातच्या संपत्तीचे आणि बेनामी व्यवहारांचे महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागल्याची चर्चा आहे. सकाळी सात वाजेपासून कागदपत्रांची तपासणी सुरू
Source link
खरातच्या ‘आर्थिक’ कुंडल्यांची पाेलखाेल:पहाटे 5 पासून ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर 17 तास सर्च ऑपरेशन; मुंबईच्या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी