![]()
जिल्ह्यात यंदा पावसाने नेहमीचे चित्रच पालटले आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दक्षिणेकडील तालुक्यांवर यंदा वरुणराजाची विशेष कृपा झाली आहे. दुसरीकडे बागायती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरेकडील पट्ट्यात मात्र तुलनेत सरासरी पाऊस कमी झाला. गेल्या वर्ष
.
जिल्ह्यात १८ जुलैअखेर १५६.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही नोंद अपेक्षित सरासरीच्या जवळपास असली, तरी प्रत्यक्षात पाऊस काही तालुक्यांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. दक्षिणेकडील कर्जत (२३४.१ मिमी), जामखेड (१७८.६), श्रीगोंदे (२०३.२), पारनेर (१९६.१), पाथर्डी (११४.७) आणि शेवगाव (९८.३) या तालुक्यांत सरासरी सुमारे १६५.१ मिमी पाऊस झाला आहे. याउलट अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे या उत्तरेकडील बागायती पट्ट्यात सरासरी केवळ १२९.९ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात ११३.७ मिमी पाऊस असूनही ६ लाख २५ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा पेरण्या केवळ ५ लाख ६० हजार ४१ हेक्टरवर झाल्या. ^जुलैचा तिसरा आठवडा संपत आला आहे. दमदार पाऊस न झाल्याने मूग, उडीद, बाजरी आणि सोयाबीनच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे. आता उर्वरित क्षेत्रात शेतकरी सूर्यफूल व मका यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांकडे वळतील. अन्यथा रब्बी हंगामाची वाट पाहावी लागेल.’ – बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ. राहुरीत ५७.२ मिमी पावसाची नोंद झाली, तो अपेक्षित पावसाच्या केवळ ३६ टक्के आहे. मुळा धरणाचे लाभक्षेत्र याच तालुक्यात असल्याने पाणी टंचाईची चिंता वाढू शकते.
दक्षिण पट्ट्यातील पावसाची स्थिती तालुका यंदाच्या वर्षी गतवर्षी पारनेर १९६.१ १३१.८ श्रीगोंदे २०३.२ ११२ कर्जत २३४.१ १००.५ पाथर्डी ११४.८ ७२.१ शेवगाव ९८.३ १००.४ जामखेड १७८.६ १०० पेक्षा कमी अहिल्यानगर १८५.१ १०० मीमी पेक्षा कमी एकूण १२१०.१ मिमी उत्तरेतील पावसाची स्थिती अकोले २२५.८ २१७.८ संगमनेर १२९.६ १३७.५ कोपरगाव १३६.८ ११५.३ राहाता १२०.४ ११४.६ राहुरी ५७.२ १०९.० नेवासे १२०.० १०० पेक्षा कमी श्रीरामपूर १०९.६ १०० पेक्षा कमी एकूण ८९९.४
मूग, बाजरी, उडीद पेरण्यांची वेळ संपली