Headlines

बोगस बियाणे, दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी ‘अन्नत्याग’:न्यायालयीन लढाईसाठी सत्ताधारी शिंदे सेना करणार सहकार्य‎




बोगस बियाणे व दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढल्यास सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे. शेतकरी एल्गार समितीवतीने अन्नदात्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन” पुकारण्यात आले आहे. बार्शीटाकळी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेत मिळणाऱ्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे बियाणे, खते, पेरणीचा संपूर्ण खर्च तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यासोबतच मागील वर्षाचा हेक्टरी १७,५०० रुपयांचा पीकविमा तत्काळ मंजूर करावा. बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्यांना काळ्या यादीत टाकावे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाला किरण ठाकरे, महादेव गावंडे, भारत चांभारे यांच्यासह अनेक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान ​ शिवसेना नेत्यांची आंदोलनस्थळी भेट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी शिवसेनेचे चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यासह सहकार नेते सुनील धाबेकर, शिवसेनेचे महेंद्र गाढवे, माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष रामेश्वर हातलोकर, तालुकाप्रमुख सचिन गालट, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकाजी अवचार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. गणेश बोबडे, सुनील बावणे, बंटी पाटील, ज्ञानेश्वर ढोरे, संतोष क्षीरसागर, रमेश बेटकर, रमेश लोणग्रे पाटील, शत्रुघ्न बिरकड, देवलाल पाटील, महादेवराव साबे, दिलीप टापरे, संतोष सोनटक्के, जनार्दन ठोकळ, गणेश ताठे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत, असे ​ शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी कळवले आहे. शिंदे गटाची उडी गतवर्षी कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले. रब्बी हंगामातही नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असून, जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरणीनंतर बियाणे न उगवल्याचे प्रकार उजेडात येत आहेत. याच अनुषंगाने उपाययोजना व संबंधितांवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप व शिवसेनेच्या ठाकरे गटांच्या आमदारांनी बैठका घेतल्या. शिवसेना पाठिशी ^बोगस बियाण्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असून, केवळ बियाणे देऊन चालणार नाही. किमान हेक्टरी ४८ हजार रुपये भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. प्रसंगी ग्राहक मंचात शेतकऱ्यांनी धाव घेतल्यास त्यांना विधिज्ञांचे सहाय्य उपलब्ध करणार . – चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा प्रमुख, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *